Health / अलर्ट राहा / जाणून घ्या, समजून घ्या आणि असा करा झीका व्हायरसशी सामना


शरीराला पूर्ण कव्हर करा आणि लांब भायांचे कपडे वापरा

दिव्य मराठी

Aug 01,2019 02:46:00 PM IST

हेल्थ डेस्क- पावसाच्या दिवसात फक्त पाणीच पडत नाही तर दुखणेही येतात. जेव्हा पाऊस संपायला येतो, तेव्हा पावसासंबंधिचे आजर येणे सुरू होतात. यातच डासांमुळे पसरणाऱ्या एका व्हायरसबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याने 2016 मध्ये खुप गोंधळ घातला होता. हा व्हायरस मुख्यत्वे नवजात बाळांवर हल्ला करतो. लहान मुलांसाठी या व्हायरसबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे.


झीका व्हायरचा इतिहास
1940 मध्ये झीका व्हायरस सगळ्यात आधी युगांडामध्ये आढळलाहोता. त्यानंतर हा खूप वेगाने पसरला, याने अफ्रिकेतील अनेक भागात पसरून अनेकांवर हल्ला केला. नंतर हा दक्षिण प्रशांत आणि आशियाच्या काही देशामधून लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहचला. ब्राझीलमध्ये जेव्हा हा भरपूर प्रमाणात पसरला, तेव्हा काही शास्त्रज्ञांनी अंदाजा लावला की, 2014 च्या फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान आशिया आणि दक्षिण प्रशांतकडून हा आला असावा. पण या दाव्याची खात्री अद्याप होऊ शकली नाही.


काय आहेत लक्षणे
हा व्हायरस एंडीज इजिप्टी नावाच्या डासांमुळे पसरतो. हे तेच डास आहेत, ज्यांच्यामुळे कावीळ, डेंगू आणि चिकुनगुनियासारखे विषाणुजन्य आजर होतात. झीका संक्रमित आईकडून आपल्या नवजात बाळात जातो. हा व्हायरस ब्लड ट्रांसफ्यूजन आणि यौन संबंधामधूनही पसरतो. झीकाचे नेमके लक्षण अद्याप समोर न आल्याने याला ओळखणे थोडे अवघड असते. पण असे सांगितले जाते की, डास चावल्यानंतर, ताप रैशेज, डोके दुखी आणि सांधेदुखी होते.


काय समस्या होते
यामुळे मायक्रोसेफली नावचा आजार होतो. माइक्रोसेफली एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. याने मुलांचे डोके लहान राहते आणि मेंदूचा विकास होत नाही. यामुळे जीवालाही धोका निर्माण होतो. यातून वाचलेल्या मुलांना आयुष्यभर मेंदूसंबंधी विकार होतात.

कसे वाचावे
झीका व्हायरसचा अद्याप कोणताही उपाय शोधला गेला नाहीये, यातून वाचण्याचा एकमात्र उपाय म्हणजे तुम्ही काळजी घ्या. डासांना घरात येऊ देऊ नका, लांग भायांचे कपडे वापरा.

X