आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मी ड्रामा : लिव्हइन पार्टनरसोबतच्या भांडणामुळे 14 व्या मजल्यावरून मारली उडी, फिल्मी स्टाईलमध्ये गर्लफ्रेंडने पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथून जवळच असलेल्या नायगावमध्ये दोन तास एकदम फिल्मी ड्रामा चालला. आपल्या गर्लफ्रेंडवर नाराज झालेल्या एका व्यक्तीने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारली. परंतु त्याच्या मागोमाग धावत आलेल्या गर्लफ्रेंडने त्याचवेळी व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला वर ओढले. एकटी महिला त्या व्यक्तीला वरती ओढू शकत नव्हती आणि यामुळे उडी मारलेला व्यक्ती जवळपास एकतास बिल्डिंगवर लटकलेला होता. काही वेळाने बिल्डिंगच्या गार्ड आणि इतर लोकांची त्यांच्यावर दृष्टी पडल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला वाचवले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


बिल्डिंगला लटकलेल्या व्यक्तीचे नाव रियाज अन्सारी सांगण्यात येत आहे. रियाज आपल्या गर्लफ्रेंडसोबत नायगाव येथील नक्षत्र बिल्डिंगमध्ये राहतो. गुरुवारी दुपारी 3.30 वाजता त्यांचे गर्लफ्रेंडसोबत भांडण झाले. भांडण वाढतच गेल्यामुळे रियाज बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याच्या मागोमाग गर्लफ्रेंडही गेली. रियाजने बिल्डिंगवरून उडी मारताच गर्लफ्रेंडने त्याची कॉलर पकडली. यामुळे तो बिल्डिंगला लटकला. मुलगी खूपवेळा त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करत होती, परंतु रियाजचे वजन जास्त असल्यामुळे ती त्याला वर ओढू शकली नाही.


मुलीचा आवाज ऐकून बिल्डिंगचा गार्ड आणि इतर शेजाऱ्यांनी छतावर जाऊन रियाजचा जीव वाचवला. हा संपूर्ण फिल्मी ड्रामा लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आणि आता व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...