आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Led TV Panel Import Duty: Finance Ministry Scraps Import Duty On Open Cell LED TV Panel From 5 Percent To Zero

सरकारने एलईडी पॅनलवरील 5% इंपोर्ट ड्यूटी संपवली; मेड इन इंडिया टीव्ही होणार 3% स्वस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ओपन सेल एलईडी टीव्ही पॅनल (15.6 इंच आणि त्याहून अधिक) वरील इंपोर्ट ड्यूटी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एलईडी टीव्ही पॅनलवर 5 टक्के इंपोर्ट ड्युटी लावली जात होती. सरकारने मंगळवारी हा आदेश जारी केला. परिणामी देशात निर्मित होणारे एलईडी टीव्ही 3 टक्के स्वस्त होणार आहेत. एलईडी टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पॅनल एक महत्वाचा घटक असतो. प्रॉडक्शनची एकूण किंमत ठरवण्यात 70 टक्के वाटा याचाच असतो. टीव्ही मॅन्युफक्चरर्सची मागणी जीएसटी कमी करण्याची आहे. परंतु, सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही.

काय आहे ओपन सेल?
टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पॅनलमध्ये अॅसेंबली करावी लागते. तर रेडी टू यूज पॅनलमध्ये याची गरज नसते. परंतु, त्यावर 15% इंपोर्ट ड्यूटी लादली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, देशातील टीव्ही मार्केट 22,000 कोटींचे आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात यात 3% टक्के घट झाली होती. टीव्हीच्या किमती जास्त आणि लोकांचा मोबाईल, स्मार्टफोनकडे वाढता कल पाहता विक्रीत घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इंपोर्ट ड्युटी संपवल्याने एलईडी टीव्ही स्वस्त होण्यात मदत होईल अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे. 

मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर लागतो 28 टक्के जीएसटी
उल्लेखनीय बाब म्हणजे, फेस्टीव्ह सीजनमध्ये मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींची विक्री वाढत असते. या दरम्यान विक्रीत आलेली तूट भरून काढता येईल असे कंपन्यांना वाटत होते. त्यामुळेच, जास्तीत-जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या इंडस्ट्रीने एलईडीवरील जीएसटी घटवून 18 टक्के करण्याची मागणी केली आहे. सध्या एलईडी टीव्हीवर 28 टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला जातो. 32 इंच पर्यंतच्या टीव्हीवर 18% जीएसटी लादला जातो. तर त्याहून अधिक इंची स्क्रीनच्या टीव्हीवर चक्क 28 टक्के जीएसटी लागतो. इंडस्ट्रीच्या नजरा आता 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीवर लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...