Home | Gossip | Leena Chandavarkar Birthday, Leena Chandavarkar Birthday Married At The Age Of 25 Some Lesser Known Facts

नव-याला चुकीने गोळी लागल्याने वयाच्या 25 व्या वर्षीच या अभिनेत्रीला आले होते वैधव्य, मग 22 वर्षांनी मोठ्या सिंगरसोबत थाटले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 11:18 AM IST

अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर यांचा आज वाढदिवस आहे.

 • Leena Chandavarkar Birthday, Leena Chandavarkar Birthday Married At The Age Of 25 Some Lesser Known Facts

  एंटरटेनमेंट डेस्क - अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर यांचा आज वाढदिवस आहे. 29 ऑगस्ट 1950 रोजी मुंबईतील एका आर्मी कुटुंबात जन्मलेल्या लीना यांनी वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या लीना या चौथ्या पत्नी होत्या. पडद्यावर बबली रुपात दिसलेल्या या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरलेले आहे. त्यांच्या आयुष्याविषयीच काही रंजक माहिती आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

  लीना यांनी आपल्या अभिनय करिअरमध्ये केवळ 30 चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांत काम करत असतानाच्या काळात त्यांचे लग्न राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाले. 1975 साली सिद्धार्थ बंडोडकरसोबत त्या विवाहबद्ध झाल्या होत्या, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या अवघ्या 11 व्या दिवशी सिद्धार्थला चुकीने गोळी लागली. काही महिने रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सिद्धार्थचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी लीना विधवा झाल्या. एवढ्या कमी वयात त्यांना वैधव्य आले होते. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 1980 साली स्वतःपेक्षा 22 वर्षांनी मोठ्या किशोर कुमार यांच्यासोबत त्यांनी लग्न केले होते.

  डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या...
  लीना यांच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर त्या नैराश्येत गेल्या होत्या. त्यांनी लोकांशी भेटणे बोलणे बंद केले होते. त्यांची अशी अवस्था बघून त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना परत घरी आणले होते. अखेर लीना यांनी पुन्हा चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला.


  कुटुंबीय झाले होते नाराज...
  पतीच्या निधनानंतर मुंबईत परतलेल्या लीना यांनी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. याचकाळात त्यांची भेट किशोर कुमार यांच्यासोबत झाली होती. हळूहळू भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी 1980 साली लग्न केले. पण लीना यांच्या वडिलांना हे नाते मुळीच मान्य नव्हते. कारण लीना यांच्याशी लग्नापूर्वी तीनदा किशोर कुमार यांचे लग्न मोडले होते. पण वडिलांच्या विरोधाला न जुमानता लीना यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर किशोर आणि लीना यांचा मुलगा सुमीतचा जन्म झाला. लग्नाच्या सात वर्षांनी म्हणजे 1987 साली किशोर कुमार यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा लीना यांना वैधव्य आले. आता लीना त्यांचा सावत्र मुलगा आणि गायक अमित कुमार आणि सुमीत कुमारसोबत मुंबईत वास्तव्याला आहेत.

  जेठमलानी यांना केले होते किस...

  2015 साली प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी भर कार्यक्रमात लीना चंद्रावरकर यांना किस केले होते. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. फेब्रुवारी 2015 मध्ये मुंबई येथे आयोजित 'हम लोग' अवॉर्ड सोहळ्यात लीना सामील झाल्या होत्या. या सोहळ्यात प्रसिध्द वकील आणि राजकिय नेते राम जेठमलानीसुध्दा पोहोचले होते. दोघांची अवॉर्ड समारंभात भेट झाली, तेव्हा जेठमलानी यांनी लीना यांना चक्क किस केले होते. या किसच्या किस्स्यामुळे दोघे चांगलेच चर्चेत आले होते. लीना यांनीसुध्दा त्यांचा हात पकडून त्यांना किस करताना दिसल्या होत्या.

  वयाच्या 19 व्या वर्षी केले होते चित्रपटसृष्टीत पदार्पण...
  लीना यांनी बालपणीपासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांच्याविषयीचा एक खास किस्सा आहे. एकदा शाळेत शिक्षिकेने त्यांना मोठेपणी काय बनायचे आहे? या विषयावर एक निबंध लिहायला सांगितला होता. त्यावर त्यांनी लिहिले होते, मोठेपणी अभिनेत्री व्हायचे आहे. यावरुन त्यांच्या शिक्षिकेने त्यांना मारले होते. त्याकाळात मुलींनी सिनेसृष्टीत पदार्पण करणे सुसंस्कृत समजले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांना यासाठी परवानगी दिली नव्हती. लीना यांनी हट्टाने एका टॅलेंट हंटमध्ये भाग घेतला आणि त्यांची निवड झाली. मात्र जेव्हा त्या मुंबईत आल्या, तेव्हा त्या अल्पवयीन असल्याने त्यांना रिजेक्ट करण्यात आले होते.

  असा मिळाला होता पहिला ब्रेक...
  कालांतराने लीना सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्या मदतीने त्यांना 1969 साली 'मन का मीत' या सिनेमात एक छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यावेळी लीना फक्त 19 वर्षांच्या होत्या. त्यानंतर लीना यांची अभिनयाची गाडी रुळावर आली.
  - 1971 साली आलेल्या मेहबूब की मेहंदी या चित्रपटात लीना यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि लीना या चित्रपटातून स्टार झाल्या. त्यांनी 'हमजोली' (1970), 'मैं सुंदर हूं' (1971), 'प्रीतम' (1972), 'रखवाला' (1972), 'मनचली' (1973), 'अनहोनी' (1974), 'एक महल हो सपनो का' (1975), 'बैरंग' (1976), 'सरफरोश' (1985) यासह 30 चित्रपटांमध्ये अभिनय केला.

Trending