आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : प्रसिद्ध म्यूझिक डायरेक्टर एआर रहमान 52 वर्षणाचे झाले आहेत. 6 जानेवारी, 1967 ला मद्रास (आता चेन्नई) मध्ये जन्मलेले रहमान यांचे खरे नाव दिलीप शेखर आहे. आज भले एआर रहमान 19 अरब (द रिचेस्ट.COM नुसार) रुपयाची नेटवर्थ आणि जग्वार, मर्सिडीज, वॉल्वो अशा कोटींच्या कार मेंटेन करतात. पण एक वेळ अशीही होती, जेव्हा त्यांना एका एका पैसाठी तरसावे लागत होते. मिडल क्लास तामिळ मुदलियार फॅमिलीमध्ये जन्मलेले रहमान यांचे वडील आरके शेखर, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांचे प्रोड्यूसर होते. मात्र, रहमान हे जेव्हा 9 वर्षांचे होते, तेव्हाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले.
अशाप्रकारे घराचा खर्च चालवत होते एआर रहमान...
- पित्याच्या मृत्यूनंतर घराची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. अशामध्ये मग ते आपल्या वडीलांचे म्यूझिकल इंस्ट्रूमेंट्स भाड्याने देऊन आपले घर चालवायचे. नंतर यासर्वांची जबाबदारी आई करीमा यांनी आपल्या शिरावर घेतली होती.
- रहमान एक खूप उत्तम की-बोर्ड प्लेयर होते. सोबतचे ते एकेवेळेला म्यूझिक बॅण्डचा बंदोबस्तही करून देत होते. खूप कमी लोकांना माहित आहेकि, शाळेत अटेंडेंस असल्यामुळे 15 व्या वर्षीच रहमान यांना शिक्षण सोडावे लागले होते.
दिलीपहुन असे बनले रेहमान अल्ला रक्खा...
- रहमान यांचा जन्म एका हिंदू फॅमिलीमध्ये झाला होता पण धर्म परिवर्तन केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून अल्ला रक्खा रहमान केले. सांगितले जाते की, 1989 मध्ये रहमान यांची छोटी बहीण खूप आजारी पडली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की, हिच्या वाचण्याची काहीच शक्यता नाहीये. रहमान यांनी बहिणीसाठी मस्जिदींमध्ये प्रार्थना केली आणि त्यांची दुआ अलाहने कबुल केली. यानंतर रहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
इस्लाम धर्म स्वीकारण्यामागचे एक कारण हेदेखील आहे...
- दुसरीकडे रहमान यांची बायोग्राफी 'द स्पिरिट ऑफ म्यूजिक' मध्ये सांगितले गेले आहे की, एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. त्यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, त्यांना त्याचे नाव आवडत नव्हते.
- एक दिवस जेव्हा त्यांची आई बहिणीची पत्रिका ज्योतिषाला दाखवायला गेली. तेव्हा ज्योतिषीने त्यांना नाव बदलायला सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले नाव दिलीपहुन एआर रहमान ठेवून घेतले.
तीन मुलांचे पिता आहेत रहमान...
- रहमान यांचे म्यूजिकल करियर सर्वानाच माहित आहे. पण त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल लोकांना जास्त माहित नाही. रहमान यांनी सायरा बानो यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुली, खतीजा आणि रहीमा आणि एक मुलगा अमीन आहे.
- मजेशीर गोष्ट ही आहे की, रहमान आणि त्यांचा मुलगा अमीन यांचा बर्थडे एकाच दिवशी येतो. रहमान यांचे जगभरात भाई कोट्याएवढी फॅन्स असतील, पण, त्यांची मुलगी खतीजाला शाळेत वडिलांचा ऑटोग्राफ द्यायला आवडत नाही.
ऑस्कर विनर आहेत रहमान...
- एआर रहमान यांना आधी इलेक्ट्रॉनिक इंजीनियर व्हायचे होते. पण एका संगीतकाराच्या घरात जन्म झालेल्या रहमान यांची ही इच्छा मात्र अपूर्ण राहिली. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही ते एकाअर्थी चांगलेच झाले. कारण जर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असते तर ते 'मद्रास चे मोजार्ट' म्हणून ओळखले गेले नसते (मोजार्ट क्लासिक युगातील प्रसिद्ध संगीतकार होते).
- हेच कारण आहे की, आजही रहमान यांना ते 50 रुपये लक्षात आहेत, जे त्यांना रेकॉर्ड प्लेयर ऑपरेट करण्यासाठी पहिल्यांदा मिळाले होते. 1992 मध्ये मणिरत्नमच्या डायरेक्शनमध्ये बनलेली फिल्म 'रोजा' पासून रहमान यांच्या फिल्मी करियरला जी सुरुवात झाली ती आता यशाच्या उंचच शिखरावर पोहोचलेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' पर्यंत पोहोचली आहे. यामुळेच त्यांना ऑस्करचे विजेते म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.