Home | National | Other State | Leh-Mughal road closure; Kashmir highways open on one side

लेह-मुघल रस्ता बंद; काश्मीरचा महामार्ग एका बाजूने केला खुला: सलग सातव्या दिवशी जोरदार बर्फवृष्टी

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 09:15 AM IST

लडाख महामार्गावर अनेक फूट बर्फ साचला असल्याने महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.

  • Leh-Mughal road closure; Kashmir highways open on one side

    श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये लडाख आणि ऐतिहासिक मुघल रस्ता यांना जोडणारा ४३४ किलोमीटरचा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बुधवारी सातव्या दिवशीही हिमवृष्टी आणि रस्त्यावरील घसरण या कारणांमुळे बंद राहिला.


    वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ३०० किलोमीटर लांबीचा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लडाख महामार्गावर अनेक फूट बर्फ साचला असल्याने महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्याने आणि रस्त्यांवर बर्फ साचल्याने महामार्गावरील घसरण वाढली आहे. महामार्गावरून बर्फ हटवण्यासाठी सीमारस्ते संघटनेचे (बीआरओ) मजूर अत्याधुनिक यंत्रांसह तैनात करण्यात आले आहेत. मात्र, या प्रक्रियेला खूप वेळ लागेल. हवामानात आणि रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. सनमर्ग आणि मीनमर्ग येथे रस्त्यांवरून बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मध्य काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्याच्या सोनमर्गमध्ये मंगळवारी मोठ्या संख्येने लडाखला जीवनावश्यक साहित्य घेऊन जाणारे ट्रक आणि तेलाचे टँकरही अडकले आहेत. अशाच प्रकारे काश्मीरला जाणाऱ्या वाहनांत रिकामे ट्रक आणि तेलाचे टँकरही द्रास, कारगिल आणि मीनमर्ग तसेच जोझिला येथे काही ठिकाणी अडकले आहेत.


    त्याशिवाय दक्षिण काश्मीरमध्ये शोपियाँ आणि जम्मूत राजौरी आणि पूंछला जोडणाऱ्या मुघल मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकले नाही. दोन्ही बाजूंनी बर्फ हटवला जात आहे. मात्र, रात्री तापमान गोठणबिंदूच्या खाली जात असल्याने रस्त्यांवर बर्फ जमा झाला आहे. त्यामुळे विशेषत: पीर-की-गली येथे निसरडेपण वाढले आहे.

Trending