आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपल्या दररोजच्या अहारात वापरल्या जाणाऱ्या लिंबूचे औषधी गुणधर्म आपल्याला जवळपास माहीत असतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लिंबूचा आहारात वापर करतात. पण, हा वापर करत असताना आपण लिंबू पिळून केवळ त्याच्या रसाचाच वापर करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, लिंबूच्या रसाप्रमाणे त्याच्या सालामध्येही औषधी गुणधर्म असते. लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. म्हणूनच आज जाणून घेऊया लिंबूच्या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म जे, तुमच्या सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकेल.
१. औषधी वापर करण्यासाठी लिंबूची साल काढताना लक्षात ठेवा की, लिंबूची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर नको. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. जेणेकरून, लेप हालणार नाही आणि खाली पडणार नाही. दोन तासानंतर हा लेप काढून टाका. वेदना कमी होतील.
२. जर तुम्हाला लेप बनविण्यास जमणार नसेल तर, एका काचेच्या भांड्यात लिंबूच्या काढलेल्या साली घ्या. यात ३ ते ४ चमचे ऑलिव ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकणाने बंद करा. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.
३. लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबाचे लोणचेही बनवले जाते. लिंबाच्या साली आर्थराइटीस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.
टिप: वरील उपाय करण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपणास एखाद्या पदार्थाची अॅलर्जी असू शकते. ज्याच्या सेवनाने अथवा त्वचेशी संपर्क आल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असा कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.