Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | lemon water and ginger drink for health tips

लिंबू-पाणी आणि अद्र्काच्या या ड्रिंकने दूर होतील अनेक आजार, अवश्य ट्राय करा

हेल्थ डेस्क | Update - Aug 16, 2018, 06:18 PM IST

अद्रकचा रस प्यायल्याने वजन कमी होते. परंतु लिंबू पाण्यात अद्रकचा रस मिसळल्याने याचे आरोग्य फायदे वाढतात.

 • lemon water and ginger drink for health tips

  अद्रकचा रस प्यायल्याने वजन कमी होते. परंतु लिंबू पाण्यात अद्रकचा रस मिसळल्याने याचे आरोग्य फायदे वाढतात. लिंबू आणि अद्रक या दोन्हींमध्ये असे घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या ड्रिंकने फक्त लठ्ठपणाच कमी होत नाही तर इतरही फायदे होतात...


  कसे बनवावे हे पेय? : लिंबाचा रस पाण्यात मिसळा. यामध्ये अद्रकचा रस मिसळा किंवा हे कुस्करून टाका. वरून साखर आणि चवीनुसार मीठ मिसळा.


  अद्रक आणि लिंबाने काय फायदा होतो?
  - यामुळे चयापचय क्रिया सुधारते. हे प्यायल्याने वजन कमी होते.
  - यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. मधुमेहाचा धोका टळतो.
  - यामुळे शरीरातील विषारी घटक दूर होतात. किडनीची सुरक्षा होते.
  - यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. सांधेदुखी कमी होते.
  - यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी-पडस्यापासून बचाव होतो.
  - यामध्ये फायबर्स असतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
  - यामुळे बॉडीचे PH लेव्हल बॅलेन्स राहते. त्वचेची चमक वाढते.
  - यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
  - यामध्ये व्हिटॅमिन-सी असते. कमजोरी दूर हाेऊन एनर्जी मिळते.
  - यामध्ये आयर्न असते. हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.

Trending