आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालंधरच्या निवासी भागात शिरलेल्या बिबट्याने वन कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात 5 जण जखमी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- पंजाबमधील जालंधरच्या लम्मा पिंड भागातील निवासी वस्त्यात गुरुवारी एक बिबट्या शिरला होता. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. लोकांनी वन विभागास माहिती दिल्यानंतर कर्मचारी बिबट्यास पकडण्यासाठी आले. तेव्हा त्याने ९ फूट उंच भिंत ओलांडून लोकांवर हल्ला केला. यात ५ जण जखमी झाले. त्यानंतरही पथकाने त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पकडण्यासाठी जालंधर, हाेशियारपूर व दसूहा भागातील पथके आली होती. या पथकाने बिबट्याला ३ ट्रँक्विलायझर दिले. पण तो बेशुद्ध पडला नव्हता. कर्मचारी तो बेहोश होण्याची वाट पाहात होते. बिबट्या आल्याचे कळताच लाेक घराच्या छतावर चढून बसले होते. 

 

> बिबट्याच्या हल्ल्यात एकाने शिडीवरून उडी टाकली, दुसरा खाली पडला 
बिबट्या एका घरात होता. पथक त्याला पकडण्यास गेले असता त्याने एका झेपेतच कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. 

> बिबट्याला पकडण्यास गेलेला दुसऱ्या कर्मचाऱ्याने शिडीवरून खाली उडी टाकली पण बिबट्याने पहिल्यास धरले 
> त्याच्यापासून सुटका करूनकर्मचाऱ्याने बिबट्यास खाली फेकले पण तोही गडबडीत शिडीवरून खाली कोसळला 
 
लोकांना वाटले ते मांजर आहे
स्थानिक लोकांनी सांगितले, दुपारी शेतात बिबट्याला पाहिले होते. आम्हाला वाटले ते मांजर असावे. परंतु त्याने लोकांकडे धाव घेतली तेव्हा समजले की, तो बिबट्या आहे. यादरम्यान त्याने काही लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. पोलिसांनी सांगितले,बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...