दहशत / बिबट्याने अंगणातून वृद्धेस फरपटत नेत घेतला जीव, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरातील दुसरी घटना

यापूर्वी २ जून रोजी गडबोरी येथे स्वराज गुरनुले या तान्हुल्याला बिबट्याने उचलून नेले होते

प्रतिनिधी

Jun 08,2019 11:44:18 AM IST

नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. ५ दिवसांपूर्वीच आईच्या कुशीतून बाळाला नेऊन ठार केल्यानंतर आता एका वृद्धेला घरातून फरपटत नेत मारून टाकल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता घडली. गयाबाई पैकू हटकर (६५, गडबोरी, ता. सिंदेवाही) असे मृताचे नाव आहे. गयाबाई अंगणात झोपलेल्या असताना बिबट्या झोपडीत शिरला. बिबट्याने अंगणात खाटेवर झोपलेल्या गयाबाईंना फरपटत नेले. प्रतिकाराची अंगात ताकद नसल्याने गयाबाई बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवू शकल्या नाहीत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गडबोरीच्या जंगलात सुमारे चार बिबटे आहेत. दरम्यान, घटनास्थळी काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
यापूर्वी २ जून रोजी गडबोरी येथे स्वराज गुरनुले या तान्हुल्याला बिबट्याने उचलून नेले होते. त्याचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.

X
COMMENT