आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्यात दरीत पडून बिबट्याचा मृत्यू, निलगायीचा पाठलाग करताना शिकारीच शिकार झाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या रवळा शिवारात नीलगायीचा पाठलाग करताना बिबट्याला तीने चकमा दिला. त्यामुळे ५० फूट खोलदरीत पडून एका तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. त्याचा मृत्यू बुधवारी झाला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

एका शेतकऱ्याला डोंगरात गेल्यानंतर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याने ही बाब अजिंठा वन विभागास कळवली. अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगदरे यांनी कर्मचाऱ्यासहित घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी अजिंठा येथे आणण्यात आला. शुक्रवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच नेमके त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

 

शिकारीच शिकार झाला!
बिबट्या निलगायीच्या शिकारीसाठी पाठलाग करत होता. या वेळी तो नीलगायीचा पाठलाग करत असताना डोंगराच्या टोकापर्यंत पळत नीलगायीने यु टर्न घेत दिशा बदलली. मात्र, बिबट्याला अंदाज न आल्याने खोलदरीत तो जावून पडला अन्् त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शिकारीच शिकार झाल्याची चर्चा होत होती.

बातम्या आणखी आहेत...