आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर- मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.  मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील दभाषी गावाजवळ  गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेदरम्यान अज्ञात वाहनांच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला.
मादी बिबट्याचे वय ४ वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच नरडाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजपूत व त्यांचे गस्तीपथक घटनास्थळी दाखल झाले.तसेच प्राणीमित्र व धुळे वनविभागाचे कार्यालयीन सहाय्यक योगेश्वर मोरे घटनास्थळी पोहचून मृत मादी बिबट्याची पाहणी करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग शिरपुर चे सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव व नेचर कंझर्वेशन फोरम चे प्रतिनिधी अभिजित पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले. शिंदखेडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने, वनपाल डी. बी. पाटील, वनरक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी पोहचून पंचनाम्यासह उत्तरीय कार्यवाही चे कामकाज पाहिले.  शासकीय वाहनाने शिंदखेडा कार्यालयात ठेवण्यात आले. यावेळी वनरक्षक संदीप पाटील हेही उपस्थित होते.
मुंबई-आग्रा महामार्गावर  शिरपूर-शिंदखेडा गावांच्या सीमेवर असलेल्या तापीनदीच्या पुलापासून शिंदखेडा हद्दीत बिबट्या लोकांना ह्या अगोदर आढळून आला असल्याचे लोकांनी सांगितले.तापीनदीच्या काठावर असलेल्या बाभळीच्या झाडांमधून हा बिबट्या आला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...