आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको भागात बिबट्या घुसल्याने दहशत, साडेनऊ तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात यश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको  एन-१ परिसरातील काळ्या गणपतीच्या पाठीमागे मंगळवारी पहाटे बिबट्या घुसला. उपाशीपोटी शिकारीच्या शोधात अालेल्या या बिबट्यामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पहाटे ५ वाजता प्रथम बिबट्या पाहिल्याचा दावा काही लोकांनी  केला. त्यानंतर सुमारे साडेनऊ तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. कन्नडचे वनरक्षक एम. ए. शेख यांनी दुपारी २ वाजून ०३ मिनिटांनी बंद खोलीत  डार्ट गनमधून बिबट्यावर निशाणा साधला. त्यानंतर २० मिनिटांनी बेशुद्ध अवस्थेत त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. 

केअर टेकरवर झेप घेतली :


गार्डनमधील बिबट्याला जाळ्याकडे ओढण्यासाठी केअर टेकर, वन्यजीव विभागाचे डॉ. राजेंद्र नाळे व काही वन कर्मचारी गेले. मात्र, बिबट्याने केअर टेकरवर पलटवार केला. या वेळी डॉ. नाळे यांनी प्लास्टिक डिफेंडरला सुरक्षा कवच बनवले व काठीने त्यावर हल्ला चढवला. यामुळे बिबट्या भिंतीकडे पळाला आणि पलीकडील बंद असलेल्या घरात शिरला. तेथेच तो अडकला.

सोयगाव किंवा गोताळा येथून आल्याचा अंदाज


हा बिबट्या अजिंठा, सोयगावच्या जंगलातून अथवा गौताळा भागातून आला असावा. अन्नाच्या शोधात तो भरकटला असावा. उपचार करून त्याला जंगलात सोडले जाईल, असे परभणी येथील विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले.भुलीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात अडकवले


कन्नडचे एम. ए. शेख यांनी १० फूट उंचीवरून झायलेझिन, केटामाइन या भुलीच्या इंजेक्शनचा निशाणा साधला. त्यानंतर १० मिनिटांनी बिबट्या हळूहळू बेशुद्ध होत गेला. २.२० मिनिटांनी बंद घरात बेशुद्ध झालेल्या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले.बातम्या आणखी आहेत...