आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोगाव, उंदरगावात पुन्हा बिबट्याची चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंदर, सोलापूर- करमाळा तालुक्यातील सोगाव, उंदरगाव परिसरात बिबट्यांचा वावर असून त्या परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवून त्यास त्वरीत पकडावे, अशी मागणी त्या शेतकऱ्यांतून होतीय. त्या परिसरात बिबट्यास गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पकडले आहेत. सध्या, त्या परिसरात बिबट्या असल्याची कोणतीही लक्षणं नाहीत. पण, खबरदारीसाठी स्वतंत्र पिंजरे व ट्रॅप कॅमेरा बसविल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. 


दोन दिवसांपूर्वी उंदरगाव शिवारातील शेतातून घराकडे निघालेल्या आश्रू गोडगे या तरुणास रात्री मोटारसायकलच्या उजेडात एक बिबट्यासदृश प्राणी दिसला. त्याने त्वरित आरडाआेरड करीत परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. त्या दरम्यान उसाच्या फडामध्ये तो प्राणी शिरला. तो बिबट्याच असल्याचे प्रत्यक्षदर्शी गोगटे यांनी सांगितले. त्याच परिसरात चिखलात एका प्राण्याच्या पायाचा ठसा उमटला असून, त्याची खातरजमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीय. 


पंधरा दिवसांपूर्वी उंदरगाव शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अकडला. त्यावर उपचार करून बिबट्यांचा अधिवास असलेल्या जंगलात त्यास सोडण्यात आले. पण, त्यानंतरही एका मादी बिबट्याचा पिलांसह वावर त्या परिसरात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. पण, वनविभागाने ती शक्यता नाकारली. यापूर्वीही वनविभागाने लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधून त्यांच्याकडे बिबट्यांपासून संरक्षणाची मागणी केली. 


वनमंत्र्यांच्या आदेशानंतर लावलेल्या पिंजऱ्यात पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या अडकला होता. बिबट्यांचा पुन्हा वावर सुरू असल्याच्या शंकामुळे भीतीचे वातावरण आहे. रात्री ऊस मजूर कामाला येण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. 


बुधवारी रात्री उंदरगाव-सोगाव शीव रस्ता येथे मला बिबट्या दिसला. परिसरातील नागरिकांना आवाज दिला. नागरिक आले व वनविभागचे कर्मचारी पण आले. उंदरगाव, वाशिंबे परिसरात दोन पिंजरे आहेत. बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असून, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.

- अश्रू मोहन गोडगे, सोगाव 

 


अचानक उसात कुत्रा किंवा तरस पळाला तरी बिबट्याची भीती मनात असल्याने तो असावा, असेही काहीना वाटू शकते. वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी गस्तीसाठी असून, पिंजरे लावलेले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 
- संजय माळी, उपवनसंरक्षक, सोलापूर 


नदीकाठ व उसाचे भरपूर क्षेत्र, सहज शिकार मिळत असणाऱ्या परिसर बिबट्या स्वत: अधिवास निर्माण करू शकतो. सोगाव येथील पायाच्या ठश्यांचे छायाचित्र तरसाचे आहे. त्याच्या पुढील बाजूस नखे असून, बिबट्याच्या पायाचा ठसा त्या आकाराचा नसतो. 
- राजेंद्र नाले, वन्यजीव अभ्यासक व सेवानिवृत्त वनाधिकारी 

बातम्या आणखी आहेत...