Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | leopard kill the baby in chandrapur district

आईजवळ झोपलेल्या बाळाला उचलून नेत बिबट्याने केले ठार

प्रतिनिधी | Update - Jun 03, 2019, 10:03 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील गोडबोरी गावातील घटना

  • leopard kill the baby in chandrapur district

    नागपूर - उन्हाळ्याच्या गरमीमुळे घराचे दार उघडे ठेवून झोपलेल्या आईच्या कुशीतून ९ महिन्याच्या बाळाला बिबट्याने ओढून नेत ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोडबोरी या गावामध्ये घडली.


    रविवारी पहाटेचा तीन ते साडेतीनचा सुमार. झोपडीवजा घरात जमिनीवर महानंदा तिच्या ९ महिन्यांच्या बाळासह झोपली होती. बिबट्याने चिमुकल्या स्वराजला जबड्यांमध्ये पकडले व तो झोपडीबाहेर पडला. खडबडून जाग्या झालेल्या महानंदाने बिबट्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत बिबट्या बाळाला घेऊन जंगलात नाहीसा झाला. रविवारी सकाळी बाळाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत तीन किमी अंतरावर आढळून आला.


    चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील गोडबोरी गावात गुरनुले कुटुंबातील घटनेने शोककळा पसरली आहे. मात्र, वाघ व बिबट्यांच्या उपद्रवामुळे सातत्याने दहशतीत वावरणाऱ्या गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.

Trending