आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरजवळील मोहदरी घाटात घडली. रात्री उशिरापर्यंत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे हे जखमी बिबट्यावर उपचार करत होते. 


मंगळवारी (दि. २५) रात्री ९ वाजेच्या सुमारास सुमारे दीड वर्षे वयाचा नर बिबट्या मोहदरी घाट परिसरात रस्ता ओलांडत असताना येथील गणेश मंदिराशेजारील वळणावर नाशिककडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. त्यामुळे बिबट्या रस्त्याच्या कडेला कोसळला. दरम्यान, सुरुवातीला बिबट्या मृत झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शेजारीच वनविभागाचे उद्यान असून तेथील वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता बिबट्या जिवंत असून त्याच्या डोक्याला मार लागल्याचे निदर्शनास आले. वनपरिक्षेत्र अधिकारी टी. बी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला तत्काळ येथील वन उद्यानात हलविले. त्यानंतर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे आणि त्यांचे सहकारी रात्री उशिरापर्यंत उपचार करत होते. बिबट्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...