आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छरदाणीत बालकांसोबत झोपले बिबट्याचे पिल्लू; पालकांची उडाली भंबेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- तालुक्यातील धामणगाव  येथे  एका कुटुंबात एक नवा पाहुणा बालगोपाळांसोबत चक्क मच्छरदाणीत जाऊन झोपला. ह्या पाहुण्याला अचानक पाहताच मात्र सर्वांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. हा पाहुणा दुसरा-तिसरा कुणी नसून बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू होते. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले. 


धामणगाव येथे  मनीषा बर्डे यांचे कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहते. मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास प्रातर्विधीसाठी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेले बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू घरात घुसले. याबाबत कुणालाच काहीही समजले नाही. घरात बर्डे यांची २ मुले मच्छरदाणी पांघरून झोपलेली होते. बिबट्याच्या पिल्लाने त्यांच्या मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश करून तो झोपी गेला. पहाटे ५ वाजता मनीषा बर्डे यांना या आगंतुक पाहुण्याची चाहूल लागल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गोरक्षनाथ जाधव यांनी धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. पिल्लू लहान असले तरी बालकांना इजा करण्याइतपत त्याच्यात क्षमता होती. 

 

बातम्या आणखी आहेत...