आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने गळा पंज्यात पकडला, आजीने धाडसाने हल्ला परतवला, मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यामुळे पुण्यात थरारनाट्य, सात जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंढवा परिसरातील केशवनगर येथे नदीकिनाऱ्याजवळ असलेल्या देवी मंदिरामागून बिबट्याने थेट गजबजलेल्या वस्तीत शिरकाव केला आणि बिथरून जात अनेकांवर हल्ला केला. यामध्ये एका वन कर्मचाऱ्यासह सात जण जखमी झाले. वन विभाग, अग्निशमन दल आणि मनपा कर्मचारी पथकांच्या अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. दरम्यान, देवी मंदिराजवळ राहणाऱ्या तारू कुटुंबीयांतील सुमित्रा सूर्यकांत तारू या रोजप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास चूल पेटवण्यासाठी उठल्या. त्यांना कुत्र्यासारखा प्राणी चुलीजवळ दिसला. मात्र, जवळ जाताच त्या प्राण्याने तारू आजींवर झडप घातली. आजींची मान आणि गळा त्याने पंज्यात पकडला. या अवस्थेतही तारू आजींनी धाडसाने आणि प्रसंगावधान राखून जवळची पाण्याची बादली बिबट्याच्या तोंडावर मारली. या अनपेक्षित हल्ल्याने बिबट्या बिथरला आणि त्याने आजींना सोडून देत तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतही आज्जींनी दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे. आजींवर सध्या उपचार सुरू आहेत.  
 
बिबट्याला प्राणिसंग्रहालयात हलवले  
मानवी वस्तीत वन्य प्राणी घुसण्याच्या घटना वाढत आहेत. लोकसंख्यावाढीचा ताण नैसर्गिक स्रोतांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. केशवनगर भागात घुसलेला बिबट्या मादी बिबट्या आहे. पकडलेल्या बिबट्याला तपासणीसाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालयात नेण्यात आले आहे.   त्यानंतर वैद्यकीय सल्ल्याने तिला पुन्हा निसर्गात सोडले जाणार आहे.  
- श्रीलक्ष्मी, उप वन संरक्षक

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...