Home | Editorial | Columns | Less aggressive than Modi, but Vajpayee is more popular

मोदींपेक्षा कमी आक्रमक, पण वाजपेयी लोकप्रियच

दैनिक दिव्य मराठीशी विशेष कराराअंतर्गत | Update - Aug 31, 2018, 07:58 AM IST

भारताच्या १४ पंतप्रधानांमध्ये भाजपने आपले दोन पंतप्रधान दिले. १९९६, १९९८ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी व २०१४ ते सध

  • Less aggressive than Modi, but Vajpayee is more popular

    भारताच्या १४ पंतप्रधानांमध्ये भाजपने आपले दोन पंतप्रधान दिले. १९९६, १९९८ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी व २०१४ ते सध्या नरेंद्र मोदी हे दोन पंतप्रधान भाजपचे आहेत. दोघेही वक्तृत्व कलेत निपुण आहेत. दोघेही अविवाहित व दोघांचा राजकीय प्रवास हिंदू हित पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून सुरू झाला. या दोघांनी आर्थिक प्रगती, आश्वासने व हिंदू बहुसंख्याकांचा सांस्कृतिक गौरव या मुद्द्यांवर सत्ता मिळवली. गेल्या १६ ऑगस्टला वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मोदींनी ‘पितृतुल्य व्यक्तीचे छत्र माझ्या डोक्यावरून नाहीसे झाले,’ अशी प्रतिक्रिया दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘वाजपेयी यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली,’ अशा शब्दांत शोक व्यक्त केला.


    वास्तविक गेली नऊ वर्षे वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून दूर, अलिप्त होते. त्यामुळे मोदी व शहा यांना पोकळी भरण्याचे दु:ख नसावे. कारण या दोघांच्या कार्यकाळात भाजप सदस्य संख्येच्या आकडेवारीनुसार भारतातील मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आणि या पक्षाला सर्वाधिक पार्टी फंड मिळाला. त्यामुळे वाजपेयी यांच्याप्रति मधुर भावना व्यक्त करत त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीचे कौतुक होत असेल तर त्याबाबत या दोघांना आनंद वाटत आहे. वाजपेयी यांच्या काळात भारताने दुसरी अणुचाचणी केली व काश्मीरवरून पाकिस्तानविरोधात कारगिलमध्ये युद्ध केले. त्यांच्या काळात भारताने आर्थिक विकास दर चांगला गाठला. पण मोदींच्या कारकीर्दीत जे विरोधाभास निर्माण झाले ते लक्षात न घेता वाजपेयी यांच्या कार्याचे मूल्यमापन करता येणार नाही. वाजपेयी सिद्धकवी व लोकप्रिय नेते होते. देशात धार्मिक दंगली घडत असतानाही (ज्याला भाजपने हवा दिली होती) देशात अन्यत्र शांतता ठेवण्यात त्यांना यश आले होते. पण देशात हिंसक हिंदू राष्ट्रवाद्यांचा हैदोस सुरू असताना त्याचा वापर निवडणुकांत वाजपेयींनी केला या दृष्टीनेही वाजपेयींकडे पाहिले जाते. १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद हिंदू कारसेवकांनी पाडली त्या घटनेने वाजपेयी व्यथित झाले होते. त्यांनी बाबरी मशिदीच्या जागी मंदिर उभे करण्याच्या भाजपच्या आंदोलनावरूनही खेद व्यक्त केला होता. वाजपेयी पंतप्रधान व मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जातीय दंगली होऊन सुमारे एक हजार निष्पाप नागरिक मारले गेले, ज्यामध्ये अधिकतर मुस्लिमांची संख्या होती. या घटनेबाबत अशोक विद्यापीठाचे विनय सीतापती म्हणतात, गुजरात दंगलीचा ठपका ठेवत मोदींना बरखास्त करण्यासाठी वाजपेयी गोव्यात भाजपच्या बैठकीला रवाना झाले होते. पण मोदींना मुख्यमंत्रिपदावरून हटवू नये असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वाजपेयींवर दबाव आणला. त्यानंतर मुस्लिमांपासून देशाला वाचवू शकतो असा एक शक्तिशाली नेता आपण आहोत अशी प्रतिमा उभी करत मोदी राजकारणात पुढे आले.


    वाजपेयी व मोदी यांच्या आर्थिक व्यवस्थापनाविषयी काही मुद्दे आहेत. वाजपेयी यांनी ज्या आर्थिक सुधारणा केल्या त्या मोदी यांना अंगीकारता आल्या नाहीत. त्यामुळे मोदींनी त्यांच्याच अनेक प्रशंसकांना निराश केले. वाजपेयी यांनी निर्गुंतवणुकीकरणासाठी एक स्वतंत्र मंत्रालय तयार केले होते, पण मोदींनी एअर इंडिया कंपनी संपूर्ण विकण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न निष्फळ ठरला. वाजपेयी यांचे निर्गुंतवणूक मंत्रालय चालवणारे अरुण शौरी मोदींचे सर्वाधिक कटू विरोधक झाले व भांडवली बाजाराचा मोदी सरकारवरचा विश्वास हळूहळू उडू लागला. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपद भूषवलेल्या यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारने फ्रान्स सरकारसोबत केलेले राफेल विमान सौद्यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शिवाय देशात लोकशाही खिळखिळी केली असाही आरोप केला. पण यावरून मतदार फारसा चिंतेत पडलेला नाही ना दिल्लीतल्या वाचाळ वर्गाला. वाजपेयी यांची शिक्षित व उच्चवर्णीय प्रतिमा समाजातल्या खालच्या थरातील मतदाराच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. पण मोदी स्वत:ला चहावाला म्हणवत असल्याने ते भाजपमध्ये निम्न जातीतले पहिले राजकारणी आहेत. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १८२ जागा जिंकण्याची कामगिरी केली होती, पण मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. वाजपेयी हे जसे लोकप्रिय होते तशी लोकप्रियता मोदींचीही आहे व येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी स्वत: एक प्रबळ नेता म्हणून पुढे येण्यास उत्सुक आहेत. मोदी अनेक बाबतीत कमजोर वाटत असले तरी हे सांगण्यास कठीण वाटते की वाजपेयी हे सर्वाधिक चतुर राजकीय नेते होते!
    © 2018 The Economist Newspaper Limited. All rights reserved.

Trending