आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात सलग 5 व्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, यंदा 9.4% तूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा ९% कमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. हवामान केंद्रानुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ८००.४ मिमी पाऊस पडला आहे. देशाची सरासरी ८८३.६ मिमी आहे. याआधी २०१७ मध्ये सरासरीपेक्षा ५.२१%, २०१६ मध्ये २.६०%, २०१५ मध्ये १३.७१% आणि २०१४ मध्ये ११.८६% कमी पाऊस झाला होता.

 

राज्यात ९% तर मराठवाड्यात २१ % तूट

- महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला.
- राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रदीर्घ खंड पडला.
- २९ सप्टेंबरअखेर राज्यात ९% तूट आहे. १० जिल्ह्यांत मोठी घट आली आहे.
- मराठवाड्यात पावसाची सर्वात जास्त २१ टक्के तूट आहे.

 

चार महिन्यांत असा बरसला पाऊस

जून : ५% कमी
जुलै : ५.८% कमी
ऑगस्ट : ७.६% कमी
सप्टेंबर : २२.३% कमी

 

 

बातम्या आणखी आहेत...