आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या व्हॅनीसा मार्केझला पोलिसांनी मारली गोळी, ती बालपणी काम मिळवण्यासाठी निर्मात्यांना लिहायची पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिस - व्हॅनीसा मार्केझ ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचे बालपणापासून अभिनेत्री व्हायचे स्वप्न होते. निर्माता आणि दिग्दर्शकांचे लक्ष स्वतःकडे खेचण्यासाठी ती बालपणीच त्यांना नित्यनेमाने पत्र लिहित असे. 30 ऑगस्ट रोजी साऊथ पासाडेना पोलिसांनी तिला गोळी मारली, ज्यात तिचा जीव गेला. ती 49 वर्षांची होती.

 

कधीच सोडली नव्हती आशा..

- व्हॅनीसाला निर्माता-दिग्दर्शकांकडून रिप्लाय येत नसे, पण तिने कधीही आशा सोडली नव्हती. बालकलाकार म्हणून झळकण्याचे स्वप्न बाळगणा-या व्हॅनीसाला पहिली संधी 1988 साली स्टँड अँड डेलिव्हर या चित्रपटात मिळाली. त्यावेळी ती 20 वर्षांची होती. 


- व्हॅनीसा बालपणापासूनच जूडी गारलँड, शर्ले टेम्पल आणि बेसि लव यांची हुबेहुब नकल करायची. 

 

2005 पासून होती आजारी..
- व्हॅनीसा 2005 पासून डिप्रेशनमध्ये होती. त्यानंतर तिला ओसीडी आणि शॉपिंग अॅडिक्शन झाले होते. याचा खुलासा स्वतः व्हॅनीसाने 2005 मध्ये एका मुलाखतीत केला होता.  


...म्हणून पोलिसांनी मारली गोळी... 
- व्हॅनीसा मार्केझ हिने पोलिसांना टॉय गन दाखवली होती. पोलिसांनी ती खरी वाटली आणि त्यांनी तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत व्हॅनेसाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अधिकारी तिच्या पॅसाडेना येथील घरात एका कामानिमित्त गेले होते. त्याचवेळी तिने पोलिसांना बनावट बंदूकीचा धाक दाखवला. तिला गोळ्या घातल्यानंतर पोलिसांनी तिच्या शस्त्राची तपासणी केला. त्यानंतर तिची बंदूक एक खेळणी असल्याचे समोर आले. 


- मार्केझ ज्या घरात राहत होती ते भाड्याचे होते. घरमालकाने तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने पोलिसांना फोन करून बोलावले होते. 


- पोलिस घटनास्थळी एक मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टरांच्या टीमला घेऊन तिच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने तिच्याशी तासभर संवाद साधला. परंतु, ती समोर येण्यास तयारच नव्हती. 


- पोलिस अखेर तिच्या घरात शिरले तेव्हा तिच्या हातात बंदूक होती. तिच्या हातात असलेली बंदूक पोलिसांनी खरी वाटली आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार केला.


प्रसिद्ध टीव्ही सीरिजमध्ये केलं होतं काम... 
- 1994 ते 1997 मध्ये अमेरिकेत गाजलेला प्रसिद्ध टीव्ही शो ER, Seinfeld आणि Melrose Place मध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 


- गतवर्षी ती ER टीव्ही शोचा सहकारी आणि प्रसिद्ध हॉलिवूड सुपरस्टार जॉर्ज क्लूनीच्या शोमध्ये लैंगिक शोषण आणि वर्णद्वेषाचे आरोप लावून चर्चेत आली होती. आपण या विषयावर बोललो म्हणूनच शोमधून बाहेर काढले होते असा आरोपही तिने केला होता. परंतु, क्लूनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपण, त्या शोचे दिग्दर्शक किंवा लेखक नव्हतो फक्त अॅक्टिंग केल्याने मला कुणी जबाबदार धरू शकत नाही अशी प्रतिक्रिया क्लूनीने दिली होती.

बातम्या आणखी आहेत...