Home | International | Pakistan | let is equal danger like al-quada- us cheif

लष्कर-ए-तोयबा संघटना अल-कायदाइतकीच धोकादायक- अमेरिका

agency | Update - May 27, 2011, 10:50 PM IST

पाकिस्तानातील बंदी घातलेली इस्लामिक संघटना लष्कर-ए-तोयबा ही अल कायदा या संघटनेइतकीच धोकादायक असल्याचे मत अमेरिकेच्या गृहमंत्री जेनेट नोपोलिटानो यांनी नवी दिल्लीत व्यक्त केले.

  • let is equal danger like al-quada- us cheif

    नवी दिल्ली- पाकिस्तानातील बंदी घातलेली इस्लामिक संघटना लष्कर-ए-तोयबा ही अल कायदा या संघटनेइतकीच धोकादायक असल्याचे मत अमेरिकेच्या गृहमंत्री जेनेट नोपोलिटानो यांनी नवी दिल्लीत व्यक्त केले.
    नोपोलिटानो सध्या भारत भेटीवर असून, नवी दिल्लीत आल्या असताना भारतीय सुरक्षा मुख्य अधिकाऱयांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई हल्ल्याला लष्कर-ए-तोयबा जबाबदार असून त्यात १६६ निरपराध लोक मारले गेले. मुंबई हल्ल्याची भारताबरोबरच अमेरिकाही चौकशीची माहिती घेत असून, खरी माहिती लवकरच पुढे येईल. दहशतवादविरोधात भारत व अमेरिका एकत्रच काम करत असून यावरुन या दोन देशाचे संबंध लक्षात येतील. भारताला मुंबई हल्ल्याबाबतचे पुरावे सादर करेल.Trending