आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहूयात बॉलीवूडमधील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील करवा चौथ कशी असते...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : करवा चौथ हा सण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात राहणारे उत्तर भारतीयदेखील मनोभावे उपवास करतात. विवाहित स्त्रियांसाठी हा सण खास असतो. या सणाला लोकप्रिय करण्यात चित्रपटांचे मोठे योगदान आहे. सिनेकलाकार खऱ्या आयुष्यातही हा सण साजरा करतात. त्यांच्याच शब्दांत वाचा या सणाचे महत्त्व...

या दिवशी जाेडीदाराच्या हातून एक घास खाल्ल्याने चांगले वाटते : बिपाशा बसू
प्रेमाचा सण साजरा करण्याचा दिवस म्हणजे करवा चौथ. मी करण आणि माझ्या चांगल्या आरोग्य आणि करणच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सर्व विवाहित महिला एकत्र येऊन पूजा करतात. मला चंद्रासमोर केले जाणारे सर्व विधी आवडतात. विशेष म्हणजे त्या दिवशी चंद्र पाहून त्या दिवसभर उपाशी राहून पहिला घास जोडीदाराच्या हाताने खाऊन एक वेगळीच जाणीव होते. तो दिवस मी कधीच विसरत नाही. शूटिंगच्या कारणामुळे करण दुसरीकडे कुठे शूटिंग करता असला तेव्हा आम्ही एकमेकांना पाहून उपवास सोडतो. सध्या तर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून एकमेकांना पाहतो. अन्नपाणी ग्रहण करतो. शूटिंगच्या दरम्यान करवा चाैथचा उपवास ठेवणे साेपे जाते. कारण अापण कामात व्यग्र असतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष जात नाही. मात्र रात्री भूक लागते. कोणत्याही परिस्थितीत हा उपवास करतोच. या सणाला लोकप्रिय करण्यात चित्रपटाचा मोठा वाटा आहे, असे मला वाटते. चित्रपटात जेव्हा एकमेकांना अतुट प्रेम करणारी जोडी जेव्हा हा सण साजरा करते, तेव्हा लोकांमध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण करते. ते पाहून लोकही प्रेरित होतात. ही चांगली गोष्ट आहे. चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यात चित्रपटाचे मोठे योगदान आहे.

या सणामुळे पती-पत्नीमधील नातेसंंबंध दृढ होतात : रवीना टंडन
माझ्यासाठी करवा चौथ हा खूप खास आणि शुभ दिवस आहे. हा मोठा रोमँटिक उत्सव आहे. यात प्रत्येक महिलेला नवरीसारखे नटायला मिळते. करवा चौथच्या दिवशी जेव्हा महिला वधूच्या वेशात असतात तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असतो. नाहीतर लग्नानंतर मुलीचे दागदागिने आणि कपडे बॅगमध्ये पडलेले असतात. त्यामुळे करवा चौथ जोडीदारांमधील रोमँटिक संबंधांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. मी सुरुवातीपासूनच उपवास करत आले आहे. पंजाबमध्ये अविवाहित मुलीही करवा चौथ करतात. पहिल्यांदा मैत्रिणीने मला करवा चौथ करायला लावले होते.

भविष्यात चांगला पती मिळावा म्हणून ठेव, असे ती म्हणाली होती. प्रत्येकीला चांगले आरोग्य, संपत्ती आणि आनंदाची इच्छा असते. पहिला करवा चौथ माझे पती अनिल यांनीदेखील केला होता. गरोदरपणातही मी उपवास ठेवला होत. उपवासाबद्दल कठोर नियम पाळत नाही. आपण आपल्या विश्वासानुसार प्रथेचे पालन करावे, असे मला वाटते. या उत्सवात उपवास ठेवणाऱ्या महिला पाणीदेखील पित नाहीत, परंतु गर्भधारणेदरम्यान मी पाणी घेतले होते. माझ्या सासूने मला लस्सी प्यायली िदली होती. उपवास करण्याची गरज नाही, असेही म्हटले होते, पण मी ठेवला होता. कारण हा उपवास वर्षातून एकदाच येतो.

रवीना पुढे म्हणते, करवा चौथच्या दिवशी वेळेवर घरी जाते. चंद्राचे दर्शन करते. नंतर अनिल आणि मी दोघेही बाहेर डिनरसाठी जातो. आई झाल्यानंतर फक्त पतीच नव्हे तर सासू्, मुले आणि कुटुंबासाठीदेखील व्रत ठेवते. माझी मुलेही यात सहभागी हाेतात. संध्याकाळी तेदेखील गच्चीवर चंद्राची वाट पाहतात. माझी मुलगी माझी थाळी सजवते. वडील काय गिफ्ट देणार, याकडे तिचे लक्ष लागलेले असते. या सणाला लोकप्रिय करण्यात चित्रपटाचेही मोठे योगदान आहे. 

आमच्या चित्रपटातून ईद, दिवाळी, होळीपासून ते इतर सर्वच सण दाखवले जातात. सर्वच सणांचे प्रगतिशील पैलू दाखवले जातात.


इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेल्या अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याविषयी सांगत आहेत त्यांचे भाऊ संजय कपूर....  
उपवास ठेवणारे अभिनेते पती नक्कीच लपूनछपून खात असतील : संजय कपू
र.... 
आमच्या घरात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा होत असतो. पूर्वी हा सण माझ्या आईच्या घरी साजरा केला जायचा. त्यांच्या घरी, आम्ही सर्व भाऊ एकत्र जमायचो. खूप मजा करायचो. आता अनिलच्या घरी हा सण साजरा केला जातो. तेथे कुटुंबातील आणि उद्योगातील मित्रदेखील त्यांच्या पत्नीसह येतात. हा सण दाेन दिवस चालतो. पहिल्या दिवशी मेंदीसाठी बायका एकत्र येतात आणि दुसऱ्या दिवशी पार्टी होते. या वर्षीही हा सण उत्साहात साजरा केला जाईल.

येथे येणारे अभिनेते अापल्या पत्नीसाठी उपवास ठेवतात. मात्र मी पत्नीसाठी उपवास करत नाही. ज्या प्रथा आहेत, त्या आम्ही पूर्ण करतो. आम्ही पत्नीसाठी उपवास ठेवतो, असे म्हणणाऱ्या कलाकारांवर मला विश्वास वाटत नाही. कारण ते लपून-लपून खात असतील, असे मला वाटते. कारण दिवसभर उपवास ठेवणे सोपे नाही. या सणाच्या दिवशी आम्ही चंद्र पाहून मालपुवे खाऊन उपवास सोडतो. यात पत्नीला पती आपल्या हाताने पाणी पाजतात. त्यानंतर त्या पतीचे दर्शन घेतात. त्यानंतर आम्ही सर्व सोबत जेवतो. स्वयंपाकदेखील एकत्र करण्यात येतो. यात सर्वच सहभागी होतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सर्व यादिवशी पूर्ण कुटुंब एकत्र येतो. आमच्या कुटुंबात वेगळी प्रथा नाही. प्रत्येक घरात जो विधी हाेतो तोच आमच्या घरातही होतो. जी परंपरा चालत आली आहे आईने जे सांगितले आहे तसेच आमच्या घरातील सुनाही करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या घरातील स्त्रिया, इतर स्त्रियांप्रमाणे दरवर्षी चंद्र या दिवशी लवकर का येत नाही, अशी तक्रार करतात. मी नेहमीप्रमाणे त्यांना सांगतो की, चंद्र आपल्या वेळेत येतो, परंतु आपणच त्याला रोज पाहत नाही.

वाढदिवस आणि करवा चौथ एकाच दिवशी आलेत
यंदाचा करवा चौथ माझ्यासाठी खूप खास झाला आहे, कारण या दिवशी माझा वाढदिवसही आहे. मी वाढदिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत राहणार आहे. दिवसभर उपवास राहील आणि त्यानंतर केक कापून साजरा केला जाईल. कुटुंबासह वेळ घालवणे आणि दिवस साजरा करणे मोठी गोष्ट आहे. माझा वाढदिवस आणि करवाचौथ एकाच तारखेला आले. हा दिवस माझ्यासाठी खूप खास ठरणार आहे. संजय कपूर

बातम्या आणखी आहेत...