आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्लीलता पसरवणाऱ्या विकृतीच्या विरुद्ध चला एकजूट करू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी विचार केला आहे का की, बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद होऊनही परिस्थिती का सुधारत नाही? वास्तविक, महिला-मुलींवरील अत्याचाराबाबत आपण केवळ गुन्हेगारांवरच लक्ष्य केंद्रित करतो. या प्रवृत्तीला चालना देणाऱ्या कारणांकडे आपले लक्षच नाही. यात इंटरनेटवर पसरवली जाणारी अश्लीलता हे एक प्रमुख कारण आहे. आज लाखो पोर्न साइट आपल्या मुलांच्या विचारांत विकृती ठासून भरत आहेत. या दुष्परिणामांवर विचार करायला नको? सरकारी आकडेवारीनुसार, देशात १५ मिनिटांत एका महिलेवर बलात्कार होतो. अशा गुन्ह्यांतील अनेक आरोपी पोर्न साइटच्या आहारी गेले असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे, देशात स्वस्त इंटरनेट डाटा, मोफत वायफाय आणि स्वस्त स्मार्टफोनमुळे सामान्य माणसाच्या अनेक अडचणी सुटल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने यामुळे पोर्नमध्ये प्रचंड वाढ झाली. चार वर्षांपूर्वी एका व्यक्तीमागे सरासरी मासिक १.५ जीबी इंटरनेट डाटा  वापरला जात होता. आज तो १० जीबी झाला आहे. गुगल ट्रेंड्स २०१९ नुसार भारतात ९० टक्के इंटरनेट युजर्स महिन्यात किमान एकदा तरी पोर्न शब्द सर्च करतात. एका अन्य अहवालानुसार, अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या ५४ टक्के भारतीयांचे वय २५ ते ३४ वर्षे आहे. यामुळे चिंता वाटणे साहजिकच आहे. दैनिक दिव्य मराठी आपल्या सामाजिक जबाबदारीबद्दल कटिबद्ध आहे. यासाठी तुमच्यासारख्या जागरूक वाचकांच्या मदतीने आम्ही मुलांना-तरुणांना या विकृतीपासून वाचवण्यासाठी पोर्न साइटवर बंदीचे अभियान सुरू करत आहोत. यात आम्ही विशेष बातम्या आणि तज्ञांचे लेख प्रसिद्ध करू. टॉक शोच्या माध्यमातून मते जाणून घेतली जातील. शिवाय ऑनलाइन पिटिशनने आम्ही देशभरातून समर्थन मिळवू. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही पोर्न साइट््सवर बंदीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करू. पंतप्रधान कार्यालयात निवेदन देऊन पोर्न साइटवर बंदीसाठी आग्रह धरू. या अभियानात वाचक म्हणून तुमच्या सहभागाने आम्ही निश्चितपणे समाजात पसरत चाललेल्या या विषवेलीवर बंदी घालण्यात यशस्वी ठरू याचा विश्वास आम्हाला वाटतो.