आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lewis Pagh Became The First Person In The World To Swim Under The Antarctic Ice Sheet

50 वर्षीय अॅथलीटची अंटार्कटिकाच्या बर्फाखाली 10 मिनीट स्विमींग, असे करणारा जगातील पहिला व्यक्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 वर्षीय लेविसने पोहताना फक्त स्वीमिंग अंडरगार्मेंट, एक कॅप आणि गॉगल घातला होता

लंडन- ब्रिटनमधील लेविस प्यूघ अंटार्कटिकाच्या बर्फाखाली पोहणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. 50 वर्षीय लेविसने पोहताना फक्त स्वीमिंग अंडरगार्मेंट, एक कॅप आणि गॉगल घातला होता. ते या बर्फाखाली 10 मिनीटे पोहले. सुप्रा ग्लेशियल तलाव्याचा पाण्यात सेफ गॉर्डच्या उपस्थितीत 2.2 वर्ग मीटर परिसरात ते पोहत होते. यात रॉस सागरदेखील सामील आहे, ज्याला 2015 मध्ये पोहल्यानंतर एक मरीन प्रोटेक्टेड एरियाम्हणून घोषित केले आहे.

लेविस जेव्हा आइस शीटच्या खाली पोहत हेते, तेव्हा तापमान फ्रीजिंग पॉइंटच्या जवळ होते. त्यांनी याबाबत सांगितले की, मी हे काम काही मिळवण्यासाठी केले नाही, तर लोकांचे लक्ष बदलत्या वातावरणाकडे नेण्यासाठी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंटार्कटिकाच्या बर्फाखाली पोहण्याचा प्यूघचा प्रवास आताच सुरू झाला आहे. त्यांना यापुढे सुप्रा-ग्लेशियल तलावात पोहणारा पहिला व्यक्ती बनायचे आहे. डरहम यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार,पूर्व अंटार्कटिकामध्ये 65,000 सुप्रा-ग्लेशियर तलाव आहेत. हे तलाव बर्फ वितळल्यामुळे तयार झाले आहेत.

आपण क्लाइमेट इमरजेंसीचा सामना करत आहोत

लेविसने ट्वीट करुन लिहीले, "मला क्लाइमेट चेंजकडे लोकांचे लक्ष खेचायचे आहे. जगभरातील ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. त्यामुळेच मी अंटार्कटिकच्या आइस शीटखाली पोहण्याचा निश्चय केला." 
 

बातम्या आणखी आहेत...