आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपल रिअर कॅमरा असलेला LG Q60 लॉन्च, म्यूजिकसाठी 7.1 चॅनल सराउंड साउंड असेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- साउथ कोरियन कंपनी LG ने भारतीय बाजारात अपला नवीन मिड रेंज स्मार्टफोन LG Q60 लॉन्च केला आहे. Q सीरीजचा हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमरा आणि DTS: X 3D सराउंड साउंड टेक्नोलॉजी असलेला फोन आहे. यूजर्सला उत्कृष्ठ म्यूजिक एक्सपीरियंस देण्यासाठी यात 7.1 चॅनल सराउंडचा वापर केला आहे. 

या स्मार्टफोनची किंमत 13,490 रुपये आहे. सध्या याला 3GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज व्हॅरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन मोरोक्कन ब्लू कलरमध्ये मिळेल.कंपनी याची सेल 1 ऑक्टोबरपासून सुरू करेल. या फोनला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.

LG Q60 चे स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये डुअल-सिम (नॅनो) असू शकते. हा फोन अँड्रॉयड 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टीमसोबत LG UI ओएसवर रन करेल. यात 6.26-इंच HD+ फुलव्हिजन वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले स्क्रीन दिला आहे. याचे रेजोल्यूशन 1520x720 पिक्सल आहे. यात मीडियाटेक हिलीयो P22 2.0GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जे 3GB रॅमवर काम करते. फोनमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज आहे, तर याला 2TB पर्यंत मायक्रो SD कार्ड सपोर्टने वाढवता येईल.कॅमेरा फीचर्स
फोनमध्ये 16 मेगापिक्सल (f/2.0) लेंस, 2 मेगापिक्सल (f/2.4) डेप्थ सेंसर लेंस आणि 5 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेंस दिला आहे. हे 120 डिग्रीपर्यंतचा एरिया कव्हर करते. हा फोन गूगल लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी लव्हर्ससाठी यात 13 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 3,500mAh बॅटरी मिळेल.