आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याला भरा फक्त 1302 रुपये आणि वयाच्या शंभरीपर्यंत मिळवा गॅरंटीड 40 हजार रुपये, अशी आहे LIC ची ही पॉलिसी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - भारतीय जीवन विमा मंडळ (LIC) च्या जीवन उमंग योजनेत छोटीशी गुंतवणूक करून आयुष्यभर पैसा मिळू शकतो. विशेष म्हणजे, या पॉलिसीमध्ये माणसाचे आयुष्य 100 वर्षे असे गृहित धरण्यात आले आहे. अर्थात वयाच्या 100 वर्षांपर्यंत पॉलिसीचा लाभ मिळत राहील. पॉलिसीत जमा होणाऱ्या पैश्यांवर किंवा मिळणाऱ्या रकमेवर कर सुद्धा भरावा लागणार नाही. ही पॉलिसी वयाच्या 3 महिन्यांपासून 55 वर्षांपर्यंत कुणालाही घेता येईल. एक ठराविक रक्कम भरल्याच्या 30 वर्षानंतर आपल्याला दरवर्षी 40 हजार रुपये मिळू शकतात.


असे समजून घ्या प्लॅन
आपल्या घरात 3 महिन्यांचे बाळ असेल आणि त्याच्यासाठी आपण जीवन उमंग योजना घेत असाल तर दरमहा 1302 किंवा वार्षिक 15298 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. अशा पद्धतीने बाळ जेव्हा 31 व्या वर्षात पदार्पण करेल, तेव्हापासून त्याला 40 हजार रुपये रुपये वार्षिक रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. त्या बाळाचे वय 100 वर्षे होईपर्यंत न चुकता दरवर्षी 40 हजार रुपये असेच मिळत राहतील. त्यातही 100 वर्षे पूर्ण करून तो 101 व्या वर्षात पदार्पण करत असेल तर एलआयसीकडून एकाचवेळी तब्बल 62.95 लाख रुपये इतकी रक्कम मिळेल.


आपल्याकडून होणाऱ्या गुंतवणूक आणि त्यातून होणारा फायदा
> दरवर्षी गुंतवणूक 15,298 रुपये
> 30 वर्षांत गुंतणूकः 15298 X 30 = 4,58,940 रुपये
> 31 व्या वर्षी रिटर्न वार्षिक 40,000 रुपये
> वयाच्या 100 वर्षांपर्यंत रिटर्न: 40000 X 70 = 28 लाख रुपये
> एकूण नफा: 28,00,000 - 4,58,940 = 23,41,060 रुपये


नॉमिनीला सुद्धा बेनिफिट
जीवन उमंग पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर सुद्धा सामिल आहे. त्याचा थेट फायदा पॉलिसीत आपण दिलेल्या वारसादाराला होणार आहे. अर्थात पॉलिसीधारकाला काही झाल्यास रिस्क कव्हर अंतर्गत पॉलिसीमध्ये असलेली ठराविक रक्कम नॉमिनीला मिळेल. ती ठराविक रक्कम किती असेल हे वार्षिक गुंतवणूक आणि प्लॅनवर विसंबून असेल. यात किमान 2 लाख रुपयांचा कव्हर आहे.

 

बातम्या आणखी आहेत...