आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC चा नवीन प्लॅन : फक्त एकदाच भरावे लागतील पैसे, आयुष्यभर रिटर्न मिळण्याची गॅरंटी; दरवर्षी मिळणार किमान 32,150 रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूज डेस्क : भारतीय जीवन बीमा निगम (LIC)ने आपला नवीन वन टाइम इनव्हेसमेंट प्लॅन लाँच केला आहे. आपण एकदा गुंतवणूक केल्यानंतर आयुष्यभर गॅरंटीड उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे हा प्लॅन एका पेंशनप्रमाणे काम करणार आहे. तुम्ही ही पेंशन मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात सुद्धा घेऊ शकतात. या प्लॅनद्वारे तुम्हाला किमान 32,150 रू वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. 

 

अशाप्रकारे मिळेल लाभ 

तुम्हाला LIC च्या या योजनेमध्ये एकाचवेळी संपूर्ण पैसे भरावे लागणार आहे. यासाठी किमान रक्कम 5 लाख रूपये तर कमाल रक्कम 1 कोटी रूपये आहे. आपण या योजनेमध्ये एकाचवेळी 10 लाख, 25 लाख आणि 50 लाख रूपयांची गुंतवणूक करू शकता. या पेंशनसाठी आपले 30 वर्षे वय असणे आवश्यक आहे. आपण या योजनेत जो पैसा गुंतवणार आहात त्याची पेंशन वयाच्या

30 व्या वर्षापासून घेऊ शकता. 

 

कोणत्या वयात किती पैसै

 

उदारण 1 :- तुमचे वय 30 वर्ष असेल आणि तुम्ही 5 लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल तर एका वर्षानंतर तुम्ही पेंशन घेण्यास सुरूवात करू शकता. 

 

मासिक 2575 रूपये
तिमाही 7802 रूपये
सहामाही 15761 रूपये
वार्षिक 32150 रूपये

 

 

उदारण 2 : - तुम्ही 10 लाख रूपये गुंतवले आणि 5 वर्षानंतर पेंशन सुरू केल्यास तुम्हाला वेगवेगळे व्याज मिळेल

 

कालावधी वार्षिक व्याज दर

5 वर्षे

91,800 9.18%
10 वर्षे 1,28,300 12.83%
15 वर्षे 1,69,500 16.95%
20 वर्षे 1,92,300 19.23%

 

 


गॅरंटीड रिटर्न आणि कर सवलत 

LIC तुम्हाला या प्लॅनमध्ये गॅरंटीड रिटर्नसोबत कर सवलत देखील देत आहे. आपल्याला रिटर्न मिळालेल्या पैशावर कर द्यावा लागणार नाही. सोबत या प्लॅनमध्ये तुम्ही एकाला तुमचा वारस बनवु शकता. तुमच्यानंतर तुमच्या वारसाला या प्लॅनचा फायदा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...