LIC च्या या / LIC च्या या प्लॅनमध्ये फक्त एकदाच करा गुंतवणूक, दुसऱ्याच वर्षापासून आयुष्यभर होत राहील इनकम; दरवर्षी मिळवा किमान 32150 रुपये

दिव्य मराठी वेब टीम

Feb 23,2019 11:28:00 AM IST

युटिलिटी डेस्क - भारतीय जीवन विमा प्राधिकरण (LIC) ने एकदाच गुंतवणुकीचा आकर्षक प्लॅन सादर केला आहे. यात फक्त एकदा गुंतवणूक करून दुसऱ्याच वर्षापासून आयुष्यभर इनकम मिळण्याची शाश्वती आहे. 'जीवन शांति' असे या योजनेचे नाव असून त्यातून कुठल्याही पेन्शन प्लॅनप्रमाणे लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये आपल्याला मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक लाभ घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. सोबतच, यामध्ये किमान वार्षिक रिटर्न्स 32,150 रुपये आहेत.


असा मिळेल फायदा
LIC च्या या योजनेत आपणास एकदाच पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी मिनिमम अमाउंट 5 लाख रुपये आणि मॅक्सिमम 1 कोटी रुपये भरता येतील. यात 10 लाख, 25 लाख आणि 50 लाख रुपये असे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. पेन्शन घेण्यासाठी आपले वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्थात आपण जो पैसा गुंतवणार त्यातून वयाच्या 30 व्या वर्षापासूनच खात्रीने निवृत्ती वेतन घेता येणार आहे.

उदाहरण -1
आपले वय 30 वर्षे असेल आणि आपण 5 लाख रुपये जमा करत असाल तर दुसऱ्याच वर्षानंतर आपल्याला पेन्शनचा लाभ मिळेल.
> मंथली 2575 रुपयांची पेन्शन
> क्वार्टरली 7802 रुपयांची पेन्शन
> हाफइयरली 15761 रुपये पेन्शन
> अॅनुअली 32150 रुपये पेन्शन


उदाहरण -2
आपण 10 लाख रुपये गुंतवणार असाल तर 5 वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल. आपल्याला यासाठी वेगळा व्याज मिळेल.

> 5 वर्षांनंतर मिळणाऱ्या 9.18% वर्षिक व्याजरासह 91,800 रुपये
> 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या 12.83% वार्षिक व्याजदरासह 1,28,300 रुपये
> 15 वर्षांनंतर मिळणाऱ्या 16.95% वार्षिक व्याजदरासह 1,69,500 रुपये
> 20 वर्षांनंतर मिळणाऱ्या 19.23% वार्षिक व्याजदरासह 1,92,300 रुपये


गॅरंटीड रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट
या प्लॅनमध्ये LIC आपल्याला खात्रीदायक रिटर्नसह टॅक्स बेनिफिट सुद्धा देत आहे. अर्थात आपल्याला येणाऱ्या रिटर्नवर कर द्यावा लागणार नाही. सोबतच, या प्लॅनचा आपण वारसदार सुद्धा बनवू शकता. आपल्या नंतर त्यांना याचा लाभ मिळेल.


अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.
https://www.licindia.in/Home/jeevan-shanti

https://www.licindia.in/CorporateSiteDemo/media/LIC_Media/jeevanshanti/Jeevan_Shanti_Hindi.pdf

X
COMMENT