आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • LIC Targets A Premium Of Rs 55 Thousand Crore, Senior Managing Director T.C. Sushil

एलआयसीचे २०१९-२० मध्ये ५५ हजार काेटी रुपयांच्या प्रमियमचे लक्ष्य; वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक टी.सी. सुशील यांच्याशी बातचीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुमुद दास 

मुंबई़ - एलआयसी या सरकारी क्षेेत्रातील विमा कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. कंपनी पहिल्या वर्षासाठी प्रीमियमच्या आधारावर या आर्थिक वर्षामध्ये ५५ हजार काेटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार केला आहे. त्यासाठी कंपनी २.५ काेटी पाॅलिसींची विक्री करणार असल्याची माहिती एलआयसीचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक टीसी सुशील यांनी दिव्य मराठीशी केलेल्या विशेष चर्चेत दिली. या क्षेत्रातील एकमेव सरकारी कंपनी असलेल्या एलआयसीने आतापर्यंत १,०१,४०२ काेटी रुपयांचा एकूण प्रीमियम प्राप्त केला. यात पेन्शन व समूह व्यवसायाचा समावेश आहे. एलआयसीकडे विमा उद्याेगाचा ७१ % हिस्सा आहे. आॅक्टाेबरपर्यंत कंपनीने १ काेटीपेक्षा जास्त पाॅलिसीची विक्री केली. यात कंपनीचा ७४ % बाजार हिस्सा आहे. एलआयसीने या आर्थिक वर्षात सिंगल प्रीमियम, नाॅन सिंगल प्रीमियम, ग्रुप पेन्शन बिझनेस व गुंतवणूक उत्पन्नात चांगली वाढ नाेंद केली आहे.या आर्थिक वर्षात १६,६०० नियुक्त्या करणार एलआयसी


नवनियुक्तीचा विचार करता एलआयसी या आर्थिक वर्षामध्ये एकूण १६,६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या विचारात आहे. टीसी सुशील म्हणाले, यामध्ये ६०० क्लास वन अधिकारी, ८,००० विकास अधिकारी आणि ८,००० लिपिक यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने अलीकडेच १ लाख एजंटची नियुक्ती केली आहे. महामंडळाकडे आता एकूण ११.८ लाख एजंट आहेत.आयडीबीआय बँकेने दिला  ४०० काेटींचा महसू


एलआयसीने आयडीबीआय बँकेचा ५१ टक्के हिस्सा खरेदी केला हाेता. आयडीबीआय बँकेने आतापर्यंत ५० हजार पाॅलिसींची विक्री केली आहे. त्यातून महामंडळाला ४०० काेटी रुपयांचा महसूल मिळाला. एलआयसीचे सध्या १४ देशांमध्ये स्थान असून आता म्यानमार, मालदिव व भूतानमध्ये विस्तार याेजना आखत आहे. कंपनीने नाेव्हेंबरपर्यंत इक्विटी बाजारात ३४ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...