आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIC's IPO For Disinvestment Targets; The Government Will Sell 46 Percent Stake Of IDBI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्गुंतवणूक लक्ष्यासाठी एलआयसीचा आयपीओ;आयडीबीआयमधील ४६ टक्के हिस्सा सरकार विकणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांवर झापड.. - Divya Marathi
डोळ्यांवर झापड..
  • एलआयसीचा किती हिस्सा विकणार हे सांगितले नाही

नवी दिल्ली- एलआयसीच्या आयपीओव्दारे निधी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय आयडीबीआय बँकेतील ४६.५ टक्के हिस्सा वित्तीय संस्था आणि किरकोळ बाजारात  विकण्यात येणार आहे. सध्या ५१ टक्के हिस्सा एलआयसीकडे आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ९३०० कोटींची गुंतवणूक सरकारने केली होती. एलआयसीचा किती हिस्सा विकणार हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही. या माध्यमातून २ लाख १० हजा र कोटींचे निर्गुंतवणकीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा विचार आहे. 

परिणाम: बाजार भांडवलानुसार एलआयसी सर्वात मोठी कंपनी बनेल   
 
सूचीबद्ध झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसपेक्षाही बाजार भांडवलानुसार एलअायसी देशातील सर्वात मोठी कंपनी बनेल. कारण सन २०१८ मध्ये एलआयसीचा नफा ४८,४३६ कोटी रुपये होता आणि संपत्ती सुमारे ३६ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड होती. या निर्णयामुळे  एलआयसीची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल,असे तज्ञांचे मत आहे. गुंतवणूक,कर्ज विभाग  आणि उत्तम प्रशासनासाठी प्रोत्साहन मिळेल.एलअायसीकडून  सरकारी समभाग आणि शेअर बाजारात सर्वाधिक गुंतवणूक करते.दरवर्षी सरासरी ५५ ते ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एलअायसीकडून केली जाते.सन २०१७-१८ च्या वार्षिक अहवालानुसार एलआयसीने कर्जरोखे अाणि बाँड्समध्ये ४,३४,.९५९ कोटींची गुंतवणूक केली होती. याशिवाय पायाभूत सुविधांसाठी मार्च २०१८ पर्यँत ३७६.०९७ कोटी रुपये दिले होते. 

निर्गुंतवणुकीचे अर्थशास्त्री 
 

२.१० लाख कोटींचे उद्दिष्ट, मात्र यंदा सप्टेंबरपर्यंत १२ हजार कोटी
 
पुढील वित्त वर्षात निर्गुंत‌‌वणुकीच्या माध्यमातून २.१० लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सन २०१९-२० मध्ये १.५ लाखांचे उदिष्ट होते. परंतु सप्टेंबरपर्यंत केवळ १२,३५९ कोटी रुपये गोळा करता आले. ही एकूण उद्दिष्टाच्या केवळ १० टक्के रक्कम आहे. यंदा मात्र हे उद्दिष्ट दुप्पट करण्यात आले आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्राची कवाडे परदेशी गुंतवणुकीसाठी उघडण्यात येणार आहेत.

पाच वर्षांत एलआयसीच्या एनपीएमध्ये  दुप्पट वाढ; सुमारे २५ हजार कोटींवर     
 
गेल्या पाच वर्षांत एलआयसीचा एनपीए (बुडीत खाते) दुप्पट झाला आहे. मार्च २०१९ पर्यंत एनपीएचा अाकडा गुंतवणुकीच्या तुलनेत ६.१५ टक्के वर होता. तत्पूर्वी, २०१४-१५ मध्ये ३.३० टक्के एनपीए होता.म्हणजे पाच वर्षांत एनपीए दुप्पट वाढला आहे. हा एनपीए खासगी क्षेत्रातील येस बँक,आयसीआयसीआय,अॅक्सिस बँकेच्या बरोबरीत आला आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत एकूण एनपीए २४,७७७ कोटी होता, तर कर्ज ४ लाख कोटी एवढे आहे.

न्यू इकॉनॉमीची लॅब
 

यंदा ४२,८५२ कोटी, गतवर्षापेक्षा सुमारे २ हजार कोटी रुपये अधिक 
 
अर्थमंत्र्यांनी यंदा प्रथमच न्यू इकॉनॉमी या शब्दाचा वापर केला अाहे. ही अर्थव्यवस्था संशोधनावर आधारित असेल.कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय),क्वांटम कंम्प्युटिंग, थ्रीडी प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज,डेटा मायनिंगसारख्या तंत्राव्दारे शोध घेण्याचा प्रयत्न होईल. खासगी कंपन्यांसाठी डेटा सेंटर्स उभारणीचे नवे धोरण असेल. न्यू इकॉनॉमीसाठी २ हजार कोटींनी बजेट वाढवून ४२ हजार ८५२ कोटी केले आहे.