आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद पडलेली LIC पुन्हा करु शकता सुरु, 15 ऑक्टोबरपर्यंत आहे वेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | भारतीय जीवन विमा निगम (LIC)कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली जात आहे. ज्या लोकांनी पॉलिसीचे प्रीमियम भरलेले नाही आणि त्यामुळे ज्यांची पॉलिसी बंद झाली. अशा लोकांना यामध्ये फायदा होणार आहे. याचा फायदा 15 अक्टोबरपर्यंतच होणार आहे. यानुसार आपले प्रिमियम भरुन आपली बंद पॉलिसी पुन्हा सुरु करता येऊ शकेल. यासाठी लेट पेमेंटमध्ये 20 टक्के सूट मिळेल. तर हेल्थ चेकअपमध्ये थोडा फायदा होईल. 


कसा मिळणार फायदा 
जर तुमच्या पॉलिसीचे प्रीमियम 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लेट पेमेंटमध्ये 20 टक्के सुट दिली जाईल. ती जास्तीत जास्त 1500 रुपये असेल. म्हणजेच, जर तुमचे प्रीमियम 90000 रुपये असेल आणि लेट पेमेंट चार्ज 12000 रुपये आहे. तर अशा वेळी 12000 वर जास्तीत जास्त 1500 रुपयांची सूट मिळेल. अशा योजनांमध्ये पॉलिसी बंद होण्याच्या तारखेला कमीत कमी 2 वर्षे पुढे ढकलले जाते. ज्या लोकांची पॉलिसी सहा महिन्यांपेक्षा कमी किंवा तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंद पडलेली आहे अशा लोकांनाच याचा फायदा होईल. 

 

पॉलिसी बंद होण्याचे कोणते कारण
पॉलिसीचे प्रीमियम भरण्याचा काळ वार्षिक, अर्ध-वार्षिक किंवा तिमाही असू शकते. जर एखाद्या कारणांमुळे तुम्ही प्रीमियम देऊ शकले नाही, तर LIC कडून वार्षिक आणि अर्ध-वार्षिक प्रीमियमसाठी कमीत कमी 30 दिवसांचा ग्रेस पीरियड देण्यात येतो. तर प्रीमियम प्रत्येक महिन्यात भरावे लागत असेल तर 15 दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. जर पॉलिसी होल्डर प्रीमियम 6 महिन्यांच्या आत भरू शकत नसेल तर पॉलिसी बंद होते.

 

बातम्या आणखी आहेत...