आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lie Detector Test Performed On Set Of 'Nach Baliye 9', While X couple Madhurima Vishal False Revealed

'नच बलिए 9' च्या सेटवर झाली लाय डिटेक्टर टेस्ट, तर समोर आले एक्स-कपल मधुरिमा-विशालचे खोटे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अशातच डान्सिंग रियलिटी शो 'नच बलिए 9' च्या सेटवर लाय डिटेक्टर टेस्ट स्पेशल एपिसोड शूट केला गेला. यादरम्यान एका वरिष्ठ पत्रकाराने स्पर्धकांकडून सत्य काढून घेण्याचे काम केले. जेव्हा हा प्रयोग विशाल आदित्य सिंह आणि मधुरिमा तुली यांच्यावर केला गेला, तेव्हा हैराण करणारे सत्य समोर आले. टेस्टमध्ये ही गोष्ट समोर आली की, 'चापट खाल्यांनंतरही विशाल आदित्य सिंहच्या मनात मधुरिमासाठी विशेष जागा आहे.'  
 

अशातच व्हायरल झाला होता व्हिडीओ... 
विशाल आणि मधुरिमा आपल्या भांडणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मधुरिमा विशालला चापट मारताना दिसत होती. लाय डिटेक्टरद्वारे अनेक सत्य समोर आले आहेत. जेव्हा मधुरिमाला विचारले गेले की, ती भांडण आणि ड्रामा क्रिएट करण्यासाठी विशालला प्रवृत्त करते का ? तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले, ज्याला मशीनने चुकीचे ठरवले.  
 
खोटे पकडले गेल्यावर मधुरिमा म्हणाली, "प्रवृत्त करते पण शोमध्ये टिकून राहण्यासाठी नाही. एक मुलगी म्हणून तेव्हा चांगले वाटते, जेव्हा लोकांचे लक्ष माझ्याकडे असते." सूत्रांनी सांगितले की, लाय डिटेक्टरनंतर विशाल आणि मधुरिमाला एक परफॉर्मन्स द्यायचा होता. पण दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि मधुरिमा रागात सेटवर माइक फेकून चालल्या गेली.  
 

एक्स-कपल आहे विशाल-मधुरिमा... 
विशाल आणि मधुरिमा शो 'चंद्रकांता' मध्ये लीड रोल करत होते. तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांवर प्रेम करू लागले. सुमारे एक वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि मग 2018 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. एका इंटरव्यूमध्ये ब्रेकअपचे कारण सांगत विशाल म्हणाला होता, "तिला (मधुरिमाला) खूप राग येतो. मी तिच्यावर प्रेम करायचो. पण आता करत नाही." एवढेच नाही विशाल हेदेखील म्हणाला होता की, दोघांचे विचार जुळत नाही.  
 

बातम्या आणखी आहेत...