आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन आणि मृत्यू नियतीचा भाग आहे, यापासून कोणीही वाचू शकत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही कथा महाभारत आणि भगवतगीतेमधील आहे. एक कावळ्याची गरुडाशी मैत्री होते. दोघेही नेहमी सोबत राहायचे. त्यांच्यामधील मैत्री अगदी घट्ट झाली होती आणि दोघेही एकमेकांपासून काहीच लपवून ठेवत नव्हते. एके दिवशी दोघेही नदीच्या काठावर बसून गप्पा मारत होते, तेवढ्यात तेथून एक यमदूत गेला आणि तो कावळ्याकडे पाहून हसला. गरुड आणि कावळ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या गप्पांमध्ये मग्न झाले. दुसऱ्या दिवशीही परत तसेच झाले. दोघेही गप्पा मारत असताना तेथून एक यमदूत गेला आणि तो पुन्हा कावळ्याकडे पाहून हसला. यावेळी मात्र कावळ्याच्या मनात शंका आली. तो गरुडाला म्हणाला हा यमदूत काही माझ्याकडे पाहून हसला आणि आजही त्याचप्रकारे हसून गेला. काहीतरी गडबड आहे. बहुतेक माझा मृत्यू जवळ आला आहे. गरुड म्हणाले असे काहीही नाही, हा एक संयोगही असू शकतो. तू चिंता करू नकोस. दोन-तीन दिवस असेच घडत गेले. रोज यमदूत कावळ्याकडे पाहून हसत निघून जायचे. आता मात्र कावळ्याला त्याचा मृत्यू जवळ आल्याचे निश्चित वाटू लागले. तो गरुडाला म्हणलं मित्र मला मरायचे नाही, परंतु हा यमदूत नक्की दोन-तीन दिवसामध्ये माझे प्राण घेऊन जाणार. हा रोज माझ्याकडे पाहून हसत आहे. गरुडालाही कावळ्याची भीती खरी वाटू लागली. त्याने कावळ्याला धीर दिला. गरुड कावळ्याला म्हणाले चिंता करू नको मित्रा, मी तुला येथून एवढ्या दूर घेऊन जाईल की, हा यमदूत तुला दिसणारच नाही. गरुडाने कावळ्याला आपल्या पाठीवर बसवले आणि जंगलापासून हजारो किलोमीटर दूर कैलास पर्वतावर नेले. दोघांच्याही मनातील भीती आता दूर झाली होती. परंतु ते कैलास पर्वतावर पोहोचून एक गुहेत गेले तर तेथे तो यमदूत आधीपासूनच उपस्थित होता. त्याने कावळ्याला पाहताच त्यावर पाश फेकला आणि त्याचे प्राण घेतले. गरुड पाहताच राहिले. गरुडाने यमदूताला असे करण्यामागचे कारण विचारले. यमदूत म्हणाले, याच्या मृत्यूची हीच वेळ लिहिण्यात आली होती, यामुळे याचे प्राण घेतले. गरुडाने पुन्हा विचारले, मग तू जंगलात यांच्याकडे पाहून हसत का होता? याला मारायचेच होते तर तेथेच मारून टाकायचे. यमदूताने उत्तर दिले, याच्या मृत्यूचे ठिकाण कैलास पर्वत होते, परंतु चार-पाच दिवसांपूर्वी त्याला जंगलात पाहून मला आश्चर्य वाटले की, हा एवढ्या कमी वेळेत कैलास पर्वतावर पोहोचणार कसा? यामुळे रोज मी यांच्याकडे पाहून हसत होतो. परंतु नियतीचा खेळ पाहा, तू याचा परममित्र असून याला एवढ्या कमी वेळेत येथे घेऊन आलास.

कथेची शिकवण
जीवन आणि मृत्यू नियतीचा भाग आहे. यापासून कोणीही वाचू शकत नाही. आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही मारू शकत नाही परंतु मृत्यू जवळ आल्यास कोणताही प्रयत्न तुम्हाला वाचवू शकत नाही.