आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य व शाळेतील धडे बहुतांशी एकसारखेच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीएसारख्या उच्च शिक्षणात एक खास विचार शिकवला जातो की, लोकांना त्रास कशाचा होतो हे शोधून काढा आणि त्याचे व्यवसाय संधीत रूपांतर करा. दुसऱ्या बाजूला तुमचे जीवन हेच मोठे शिक्षण आहे. हे जीवन सर्वांना एकाच प्रकारचे शिक्षण देत असते. पण एक सल्लाही देते की, समाधानाच्या दिशेने जीवनाचा प्रवास करा. तुम्ही जर स्मार्ट असाल तर म्हणाल की, लोकांना उपयोगी असे प्रॉडक्ट बनवा किंवा शक्य असेल तर स्वत:च माध्यम बना. या संकल्पनेवर आधारित दोन कथा आहेत. पहिली कथा- संदीप दहिया हे बंगळुरूच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत संचालक आहेत आणि ते हेल्मेट घालून बाइकवर जातात. आता तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे? महत्त्वाची गोष्ट ही की, त्यांचे हेल्मेट एअरकंडिशन्ड आहे. हेल्मेट घालणारे अनेक दुचाकीचालक, डोक्याला घाम येतो म्हणून सिग्नलला हेल्मेट काढून पेट्रोल टँकवर हेल्मेट ठेवतात, असे दिसले. त्यावरून हेल्मेटच वातानुकूलित करण्याची कल्पना त्यांना सुचली. ते स्वत: एक रायडर असून हेल्मेटमुळे श्वास कोंडल्याचा अनुभव येऊ नये म्हणून त्यांनी हे युजर फ्रेंडली हेल्मेट तयार केले. या एसी हेल्मेटचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे पाठीवर लादता येणारा अनेक सुट्या भागांतून तयार होणारा एक बॅकपॅक, ज्यात हेल्मेटमध्ये हवा भरण्यासाठी एक रबर ट्यूब बसवण्यात आलेली असते. याला जोडलेला दुसरा भाग म्हणजे डोक्यावरचे हेल्मेट. डोक्यावर घालायच्या युनिटमध्ये एक रिव्हर्स थर्मोकपल, हीट एक्स्चेंजर, कंट्रोल आणि ब्लोअर आहे. येथे कोठेही विद्युत पुरवठा नाही. हीट एक्स्चेंजर हवा थंड करतो. १२ व्होल्ट डीसी पॉवर बाइकच्या बॅटरीतून मिळते. या संपूर्ण युनिटचे वजन १.७ किलो आहे. बाजारात मिळणारे बहुतांश हेल्मेट ८०० ग्रॅम ते २ किलो वजनाचे असतात. संदीप यांनी गेल्या साडेचार वर्षांत असे आठ विविध मॉडेल्स बनवले आहेत. दुसरी कथा : हैदराबादच्या चहा विकणाऱ्या रामसिंह यांना जेव्हा आपल्या चार महिन्यांच्या मुलाला रुग्णालयात तातडीने न्यायचे होते तेव्हा त्यांनी अॅम्ब्युलन्स न मागवता ८३ वर्षांचे वृद्ध रिक्षाचालक मोहंमद हनीफ यांना बोलावले. कारण कोणाला रुग्णालयात पोहोचवण्याचे ते पैसे घेत नाहीत. रिक्षावर त्यांनी तसा फलकच लावला आहे. हनीफ यांच्याकडे साधा मोबाइल आहे, त्यावरून फक्त संवादाची देवाणघेवाण करता येते. ते जेव्हा कोणालाही सेवा देतात, तेव्हा आपला मोबाइल नंबर कागदावर लिहून देतात. त्यांना या रुग्णसेवेची कहाणी सांगा असे ते आवर्जून सांगतात. त्यांना नंबर सेव्ह कसा करतात हेही माहीत नाही. म्हणून ते सेवा दिलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचे नंबर डायरीत टिपून ठेवतात. दिवस किंवा रात्रीचे कितीही वाजलेले असो, हा तीन पायांचे वाहन चालवणारा जीवनरक्षक कोणत्याही आजारी गरजू माणसाला नाही म्हणत नाही. इतकेच नाही तर ते जेव्हा रामसिंह यांच्या दुकानावर चहा प्यायला येतात, तेव्हा विश्वासाने सांगतात की, जोपर्यंत श्वास घेतोय, तोपर्यंत समाजाची सेवा करत राहीन.'

फंडा असा : एक यशस्वी आणि सच्च्या मनाचा माणूस बनण्यासाठी, तुम्हाला तुमचे उच्च शिक्षण आणि जीवनापासून मिळालेले शिक्षण यांचा मिलाप घडवता आला पाहिजे.
 

बातम्या आणखी आहेत...