आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदूषणाने चीनमध्ये आयुर्मान 2.9 वर्षांनी घटले ,वार्षिक 11 लाख मृत्यू; अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी संस्थेचा दावा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमधील प्रदूषणाचा विळखा वाढत चालला असून त्यामुळे देशातील सरासरी आयुर्मान घटल्याचे दिसून आले. २०३० पर्यंत प्रदूषणामुळे लोकांचे सरासरी वय २.९ वर्षे कमी होण्याची शक्यता आहे, असा दावा अमेरिकी संशोधकांच्या पाहणीतून करण्यात आला आहे. 

 

चीनने जागतिक बँकेच्या मापदंडानुसार प्रदूषण कमी करण्यात यश मिळवल्यास सरासरी वयोमान ७६.३ टक्क्यांहून ७९ वर्षांपर्यंत पोहोचू शकेल, असे अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट विभागाने म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने प्रदूषण नियंत्रणात काही अंशी का होईना यश मिळवल्याचे निरीक्षणही या संस्थेने नोंदवले आहे. 

चीनने सरासरी कार्बन उत्सर्जनाचा मापदंड ३५ मायक्रोग्रॅम असे निश्चित करण्यात आला आहे. मात्र चीनमध्ये मापदंडाच्या तीनपट अधिक उत्सर्जन होते. प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्याला फटका बसला असून त्यातून लठ्ठपणा, तणाव व स्मृतिभ्रंश इत्यादी आजार वाढू लागले आहेत. त्यामागे प्रदूषण हेच मोठे कारण असल्याचे जाणकारांना वाटते. 

 

पुरुषांच्या तुलनेत महिलांना प्रदूषणाचा जास्त फटका 
- एमआयटी चायना फ्यूचर सिटी लॅबनुसार वायू प्रदूषणाची पातळी वाढल्याचा थेट फटका लोकांच्या आनंदी वृत्तीवर पडला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जगण्यावर त्याचा सर्वात वाईट परिणाम दिसून येतो. 
- संशोधकांनी चीनमधील अनेक शहरांतील हवेतील प्रदूषणास त्यासाठी जबाबदारी मानले. पीएम २.५ स्तर व २.१ कोटी ट्विटच्या विश्लेषणातून शहरी लोकांमधील आनंद विरळ होण्यास प्रदूषण कारणीभूत असल्याचे आढळून आले 
- चायनीज हाँगकाँग विद्यापीठानुसार देशात दरवर्षी हवेतील प्रदूषणामुळे ११ लाख लोक मृत्युमुखी होतात.त्यातून अर्थव्यवस्थेला वार्षिक २.७ लाख कोटींचा फटकाही बसतो. 
 

बातम्या आणखी आहेत...