आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशावरून महिलेचा पेट्रोल ओतून खून, कोन्हेरीतील एकाला जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पैशाच्या कारणावरून रेखा मधुकर पवार (वय ५०, रा. सारोळे पाटी, ता. मोहोळ) यांचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी बुधवारी शिक्षा सुनावली. हरिदास किसन कोरडे (वय ५०, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ) याला शिक्षा झाली आहे. ही घटना २० ऑक्टोबर २०१६ रोजी कोन्हेरी गावात घडली होती. 


याबाबत माहिती अशी
रेखा पवार यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये कोरडे याने घेतले होते. त्या पैशाची मागणी करण्यासाठी रेखा या घरी गेल्यानंतर तू मला पैसे दिले नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून शिवीगाळ करीत घरात ठेवलेली पेट्रोलची बाटली आणून अंगावर ओतून पेटवून दिले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २० नोव्हेंबर रोजी रेखा यांचा मृत्यू झाला. मोहोळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे, डॉ. विजयकुमार सूळ यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. सरकारतर्फे अॅड. आनंद कुर्डूकर, आरोपीतर्फे बी. आर. बायस यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...