Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Life imprisonment till death to abuser's

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2018, 07:35 AM IST

चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बाळू बर्डे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

  • Life imprisonment till death to abuser's

    नगर- अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बाळू गंगाधर बर्डे (३२ वर्षे, राहुरी) याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.


    ८ डिसेंबर २०१६ च्या रात्री रेल्वेस्टेशनवर निवाऱ्यासाठी थांबलेल्या एका जोडप्याची ओळख करून घेत बर्डेने या चिमुरडीचे अपहरण करून निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केले. जखमी अवस्थेत मरणाच्या दारात सोडून त्याने पोबारा केला. ९ डिसेंबरच्या सकाळी चिमुरडी बेशुध्दावस्थेत पाेलिसांना दिसली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी स्वत: फिर्याद देत अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. २२ दिवसानंतर आरोपीला पकडण्यात पथकाला यश आले. सर्व तपासण्या पूर्ण करून आरोपीच्या विरोधात २७ फेब्रुवारी २०१७ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.


    सुरूवातीला न्या. सुवर्णा केवले यांच्यासमोर हा खटला चालला. त्यांच्या बदलीनंतर हा खटला न्या. भिलारे यांच्याकडे वर्ग झाला. मात्र, लोणी मावळा हत्याकांड, कोपर्डी अत्याचार प्रकरणांमुळे या खटल्याचे कामकाज लांबले.

Trending