Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Life imprisonment to Imran Mehdi again

इम्रान मेहदीस पुन्हा जन्मठेप; खटल्याची अंतिम सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 10:09 AM IST

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून इम्रान मेहदी व त्याच्या टोळीने शेख नासेर शेख चांद याचाही खून केला होता.

  • Life imprisonment to Imran Mehdi again

    औरंगाबाद- पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून इम्रान मेहदी व त्याच्या टोळीने शेख नासेर शेख चांद याचाही खून केला होता. या खून खटल्याची अंतिम सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सवर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली असता त्यांनी इम्रान मेहदी आणि सय्यद जहीर ऊर्फ शेरा या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


    राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सलीम कुरेशीच्या खुनाचा तपास करताना तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता खबऱ्या असल्याच्या संशयावरून इम्रान मेहदी व त्याच्या टोळीने शेख नासेरला २०११ च्या गणपती विसर्जनाच्या दिवशी घरी बोलावून ज्यूसमध्ये गुंगीच्या गोळ्या टाकून बेशुद्ध केले. दोरीने गळा आवळून आणि नंतर चाकूने वार करून खून केला होता. सावंगी शिवारातील इरफान फार्म हाऊसमध्ये त्याचे प्रेत पुरून टाकले असल्याची कबुली सय्यद जहीर ऊर्फ शेराने दिली होती.

Trending