आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील Osho आश्रमात अशी असते लाइफ... प्रवेश करण्‍यापूर्वी होते HIV टेस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आचार्य रजनीश 'ओशो' यांच्‍या आश्रमात रोज जगाच्‍या कानाकोपऱ्यातून त्‍यांचे हजारो अनुयायी हजेरी लावतात. यामध्‍ये बॉलीवुड आणि हॉलीवुडचे अनेक सेलेब्रिटीजसुद्धा आघाडीवर आहेत. यात नुकतंच दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आध्यात्माकडे वळला असून त्यानेही संन्यास घेतला आहे. साक्षी खन्नाने आध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमात प्रवेश घेतला आहे. पण, अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 80 च्या दशकात करिअर यशोशिखरावर असताना विनोद खन्ना यांनीही चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवून ओशोंच्या आश्रमात अनेक वर्षे घालवली होती.

जाणून घ्या ओशोंच्या आश्रमात कसे असते आयुष्य
 
आपल्‍या बिनधास्‍त आणि स्पष्ट विचारांमुळे ओशो कायम चर्चेत राहिलेत. त्‍यांच्‍या विचाराप्रमाणेच पुण्‍यातील कोरेगाव पार्क परिसरातील 28 एकर जागेत त्‍यांचा आश्रम आहे. 1974 मध्‍ये तो बांधण्‍यात आला. या ठिकाणी नैसर्गिक वातावरणाला आधुनिकतेची जोड देण्‍यात आलेली आहे. आत गवताचे गालीचे, संगमवर दगडाचे नक्षीकाम, काळ्या रंगात बांधलेली आकर्षक इमारत, पाण्‍याचे कृत्रिम झरे, चहुकडे हिरवळ, गार हवा, ओलिंपिक साइजचे स्विमिंग पूल आणि जवळपास बसलेले विदेशी अनुयायी दिसतात. आश्रमातील हे देखावे कुणाच्‍याही मनाला हवेहवेसे वाटतात.
> प्रवेशापूर्वी एचआयव्‍ही चाचणी सक्‍तीची या आश्रमात प्रवेश करण्‍यापूर्वी मुख्‍य गेटवर असलेल्‍या रिसेप्शन सेंटरवर 1500 रुपये शुल्‍क भरून आत जाण्‍यासाठी नोंदणी करावी लागते. नंतर नोंदणी केलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या एचआयव्‍ही चाचणीसाठी ब्लडचे सँपल घेतले जाते. त्‍यानंतरच तिला आश्रमात प्रवेश दिला जातो. यासाठी विशिष्‍ट्य ओळखपत्र दिले जाते.


> आश्रमात ड्रेस कोड आश्रमात एक ड्रेस कोड लागू आहे. येथे येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला लाल आणि पांढ-या रंगाचा एक विशेष गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. हा गणवेश आश्रमाबाहेर स्‍वस्‍त दरात उपलब्‍ध आहे. आश्रमात राहण्‍यासाठी प्रति दिन 6 हजार ते 10 हजार भाड्यावर खोली मिळते. श शिवाय आश्रमाबाहेरसुद्धा काही हॉटेल आहेत तिथे या पेक्षा कमी दरात रुम मिळतात.असे आहे आश्रमातील वातावरण


आश्रमात प्रवेश केल्‍यानंतर एक इंडक्शन क्लास घेतला जातो. यामध्‍ये 30 ते 40 व्‍यक्‍ती सहभागी असतात. त्‍या नंतर आश्रमला फेरफटका मारला जातो. रात्रीच्‍या वेळी येथील मेडिटेशन रिजॉर्टचे विलासी जीवन पाहण्‍यासारखे असते. येथे उघड्या आकाशाखाली जेवण, संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम होतो. यात ब्राजील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान, रशिया आणि ब्रिटेनसह इतर देशातील आलेले 100 पेक्षा अधिक विदेशी अनुयायी भाग घेतात. येथे ताण-तणाव दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो.
दर्शनशास्त्राचे प्राध्यापक आणि अध्यात्मिक गुरू असलेले ओशो रजनीश समाजवाद, धार्मिक व्यवस्था, सामाजिक चालीरीती आणि चालू धर्मकारणावरील प्रखर टीकेमुळे सतत वादग्रस्त राहिले. ते नेहमीच स्थळ आणि वेळेच्या पलीकडे राहिले. 1960 च्या दशकात ते आचार्य रजनीश, 1970 आणि 80 च्या दशकात भगवान श्री रजनीश आणि 1989 नंतर ते ओशो या नावाने प्रसिद्ध झाले. 1970 मध्ये ते काही काळासाठी मुंबईत राहिले. 1974 पासून पुण्यात राहिले आणि तेथे त्यांनी एक आर्शम स्थापन केला. या आर्शमाकडे परदेशी नागरिक मोठय़ा संख्येने आकर्षित झाले.यामुळे राहिले वादग्रस्त ओशो 1981 मध्ये अमेरिकेला गेले. तेथील ऑरेगॉन येथे त्यांच्या अनुयायांनी इंटरनॅशनल कम्युनिटीची स्थापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण रजनीशपुरम या नावाने ओळखले जाऊ लागले. एका वर्षातच तेथील स्थानिक रहिवासी आणि कम्युनिटी यांच्यात जमिनीवरून वाद निर्माण झाला.
त्यांच्या अनुयायांनी ओशोंसाठी रोल्स रॉयस मोटार कार्सची खरेदी केल्यामुळेही त्यांची खूप बदनामी झाली. जेवढय़ा रोल्स रॉयस कार अमेकिरन राष्ट्रपती आणि प्रस्थापित र्शीमंतांजवळ नव्हत्या तेवढय़ा कार्स ओशोंच्या ताफ्यात चालत होत्या. त्यांनी प्रत्येक परंपरा, धर्म आणि राजकारण्यांचा विरोध केला, त्यामुळे ते वादाचे केंद्रबिंदू राहिले. अमेरिकेत राहत असताना त्यांनी ख्रिश्चियानिटीवर प्रहार केला आणि कम्युनिझमचे उदाहरण दिले. याशिवाय पाश्चिमात्य देशांतील तरुणवर्ग त्यांच्या आध्यात्म दर्शन आणि आंदोलनाशी मोठय़ा संख्येने जोडले जात होते. अशा वेळी ओशोंची पकड ढिली करण्यासाठी आणि त्यांची विचारधारा नष्ट करण्यासाठी ओशो यांना अमेरिकेत स्थलांतर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन निर्वासित करण्यात आले होते.ओशो यांच्या चळवळीमुळे 21 देशांनी त्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली. त्यानंतर ते जगभराचा दौरा करून पुण्याला परतले. येथे त्यांनी 1990 मध्ये आपल्या शरीराचा त्याग केला. स्लो पॉयझन ? ओशो यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता
 
त्यांना अमेरिकेत 1985 ते 1989 या कालावधीत थेलियम; (स्लो पॉयझन) विष देण्यात आले होते. खरे म्हणजे अमेरिकन सरकार ओशोंना घाबरत होते. प्रवचनादरम्यान त्यांनी आपल्याला विष दिल्याचे अनेकदा म्हटले आहे. अमेरिकेन कारागृहातील एक दिवस त्यांच्या स्मरणात नव्हता. कदाचित याच दिवशी त्यांना विष देण्यात आले होते, असे म्हटले जाते. मृत्यू एक उत्सव आहे. मृत्यूची वेळ निश्चित होत असेल तरी भीती वाटू देऊ नये, असे ते म्हणायचे.स्वत: काहीच लिहिले नाही आज लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी जगभरात पसरलेले आहेत. ओशोंच्या नावावर जगभरात कोट्यवधी रुपयांच्या साहित्याची विक्री होत आहे. पुणे येथील ओशो सेंटरनुसार, ओशो यांची प्रत्येक मिनिटाला सुमारे तीन पुस्तके जगभरात विकली जातात. मात्र, ओशो यांनी कधीही स्वत: आपल्या हातांनी काहीही लिहिलेले नाही, कदाचित हे अत्यंत कमी लोकांना माहिती असेल. त्यांनी जगभरात फिरून भाषणे दिली आणि त्या भाषणांच्या ऑडिओही उपलब्ध आहेत. असे म्हणतात की, जेव्हा ते विद्यापीठात लेक्चर द्यायचे तेव्हा प्रत्येक शाखेचे विद्यार्थी रांगा लावून त्यांना ऐकायचे. 
ओशो यांचे 9,500 तासांचे डिस्कोर्सेस (भाषणे) आणि सुमारे 3,500 तासांची चर्चा रेकॉर्डेड आहे. ही सर्व भाषणे आणि चर्चा त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असणार्या अनुयायी आणि मित्रांनी (ओशो कुणालाही आपला शिष्य मानत नव्हते, ते सर्वांना मित्र म्हणायचे) रेकॉर्ड केली आहे. त्यांच्या अनुयायांनीच नंतर त्यांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित केले.ध्यानधारणेचे 112 विधी ओशो यांनी ध्यानधारणेबाबत खोलवर जाऊन विचार केला. त्यांनी ध्यानधारणेचे 112 विधी बनवले. हे विधी 21व्या शतकातील तणावग्रस्त लोकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या या विधींचा प्रयोग केल्याने अनेक कन्सल्टंट, कर्मचारी तणावमुक्त होत आहेत. शरीराचा त्याग करण्यापूर्वी त्यांनी सांगितलेल्या ध्यानधारणेच्या विधीला देह और मन से संवाद; असे नाव दिले. या विधीमध्ये शांत होऊन पहुडण्यास सांगितले जाते. त्यानंतर शरीराच्या ज्या भागात वेदना होत आहेत त्या भागाशी संवाद साधला जातो. यादरम्यान वेदना शरीराच्या बाहेर पडत असल्याचेही सांगण्यात येते. तसेच त्याचा आभासही करून देण्यात येतो.सुरुवातीपासूनच विद्रोही ओशो सुरुवातीपासूनच विद्रोही होते. शालेय जीवनात ते गुणवान; परंतु विद्रोही विद्यार्थ्याच्या रूपाने प्रसिद्ध झाले होते. 1951 मध्ये 19 वर्षांचे असताना त्यांनी जबलपूर येथील हितकर्णी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे शिक्षकासोबत वाद झाल्यामुळे त्यांना महाविद्यालय सोडण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी जबलपूर येथीलच डी. एन. जैन महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, येथेही त्यांनी शिक्षकांना आपल्या तर्कांमुळे अडचणीत आणल्याने त्यांच्यावर महाविद्यालयात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांनी 1957 मध्ये सागर विद्यापीठातून दर्शनशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि रायपूर येथील संस्कृत महाविद्यालयात आपली जागा निश्चित केली. मात्र, विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य, चारित्र्य आणि धर्म यासाठी ओशो धोकादायक असल्याचे सांगत तेथील कुलगुरूंनी त्यांच्यावर बदली करून घेण्यास दबाव टाकला. 1958 मध्ये त्यांनी जबलपूर विद्यापीठात दर्शनशास्त्र शिकवले आणि येथेच त्यांना 1960 मध्ये पदोन्नती मिळून ते प्राध्यापक झाले. विद्यापीठात नोकरी करत असताना ते देशभरात आचार्य रजनीश या नावाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. मात्र, 1966 मध्ये एका वादग्रस्त वक्तव्यानंतर विद्यापीठाच्या विनंतीवरून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 1968 मध्ये संभोग से समाधि की ओर; या पुस्तकाने त्यांना वादग्रस्त आणि बहुचर्चित व्यक्तिमत्त्व बनवले.पहिलीतच शिक्षकाला विरोध


जेव्हा ओशो पहिल्या वर्गात प्रवेश घेऊन शाळेत पोहोचले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी शिक्षकाच्या विरोधात आंदोलन केले. खरे म्हणजे हा शिक्षक मुलांना बेदम मारून शिकवत होता. त्या शिक्षकाने अनेक पिढय़ांना असेच शिकवले होते, त्यामुळे त्यांना विरोध करण्याची कुणातही हिंमत नव्हती. एवढेच नाही, तर ओशोंच्या वडिलांनाही त्यांनीच शिकवले होते. ओशोंनी खुलेआम त्या शिक्षकाला विरोध केला आणि त्यांच्या कार्यपद्धतीची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली; पण त्यांनी कारवाई करण्यास नकार दिला. ही महापालिकेची शाळा असल्याने ओशोंनी आयुक्तांकडे तक्रार केली; पण त्यांनीही दाद दिली नाही. मग ते सभापती आणि उपसभापती यांच्याकडे गेले आणि तेव्हा कुठे त्या संबंधित शिक्षकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
दर्शनशास्त्राचे प्राध्यापक आणि अध्यात्मिक गुरू असलेले ओशो रजनीश समाजवाद, धार्मिक व्यवस्था, सामाजिक चालीरीती आणि चालू धर्मकारणावरील प्रखर टीकेमुळे सतत वादग्रस्त राहिले. ते नेहमीच स्थळ आणि वेळेच्या पलीकडे राहिले. 1960 च्या दशकात ते आचार्य रजनीश, 1970 आणि 80 च्या दशकात भगवान श्री रजनीश आणि 1989 नंतर ते ओशो या नावाने प्रसिद्ध झाले. 1970 मध्ये ते काही काळासाठी मुंबईत राहिले. 1974 पासून पुण्यात राहिले आणि तेथे त्यांनी एक आर्शम स्थापन केला. या आर्शमाकडे परदेशी नागरिक मोठय़ा संख्येने आकर्षित झाले.यामुळे राहिले वादग्रस्त
 
ओशो 1981 मध्ये अमेरिकेला गेले. तेथील ऑरेगॉन येथे त्यांच्या अनुयायांनी इंटरनॅशनल कम्युनिटीची स्थापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण रजनीशपुरम या नावाने ओळखले जाऊ लागले. एका वर्षातच तेथील स्थानिक रहिवासी आणि कम्युनिटी यांच्यात जमिनीवरून वाद निर्माण झाला. त्यांच्या अनुयायांनी ओशोंसाठी रोल्स रॉयस मोटार कार्सची खरेदी केल्यामुळेही त्यांची खूप बदनामी झाली. जेवढय़ा रोल्स रॉयस कार अमेकिरन राष्ट्रपती आणि प्रस्थापित र्शीमंतांजवळ नव्हत्या तेवढय़ा कार्स ओशोंच्या ताफ्यात चालत होत्या. त्यांनी प्रत्येक परंपरा, धर्म आणि राजकारण्यांचा विरोध केला, त्यामुळे ते वादाचे केंद्रबिंदू राहिले. अमेरिकेत राहत असताना त्यांनी ख्रिश्चियानिटीवर प्रहार केला आणि कम्युनिझमचे उदाहरण दिले. याशिवाय पाश्चिमात्य देशांतील तरुणवर्ग त्यांच्या आध्यात्म दर्शन आणि आंदोलनाशी मोठय़ा संख्येने जोडले जात होते. अशा वेळी ओशोंची पकड ढिली करण्यासाठी आणि त्यांची विचारधारा नष्ट करण्यासाठी ओशो यांना अमेरिकेत स्थलांतर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन निर्वासित करण्यात आले होते. ओशो यांच्या चळवळीमुळे 21 देशांनी त्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घातली. त्यानंतर ते जगभराचा दौरा करून पुण्याला परतले. येथे त्यांनी 1990 मध्ये आपल्या
शरीराचा त्याग केला.
ध्यानधारणेचे 112 विधी ओशो यांनी ध्यानधारणेबाबत खोलवर जाऊन विचार केला. त्यांनी ध्यानधारणेचे 112 विधी बनवले. हे विधी 21व्या शतकातील तणावग्रस्त लोकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या या विधींचा प्रयोग केल्याने अनेक कन्सल्टंट, कर्मचारी तणावमुक्त होत आहेत. शरीराचा त्याग करण्यापूर्वी त्यांनी सांगितलेल्या ध्यानधारणेच्या विधीला देह और मन से संवाद; असे नाव दिले. या विधीमध्ये शांत होऊन पहुडण्यास सांगितले जाते. त्यानंतर शरीराच्या ज्या भागात वेदना होत आहेत त्या भागाशी संवाद साधला जातो. यादरम्यान वेदना शरीराच्या बाहेर पडत असल्याचेही सांगण्यात येते. तसेच त्याचा आभासही करून देण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...