आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या या Female Only तरुंगात एकही इस्रायली नाही; अशी असते महिला कैद्यांची दैनंदिनी, पाहा Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे इस्रायलमध्ये असलेल्या खास महिलांच्या तुरुंगातील आहेत. नर्वे त्रिजा असे या तुरुंगाचे नाव असून येथे 200 महिला कैद आहेत. त्यामध्ये 18 ते 70 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तेल-अव्हीव येथील फोटोग्राफर तोमर इफराहने या तुरुंगातील काही फोटोज टिपले आहेत. तोमर यांना 2011 मध्ये जेलमध्ये जाऊन पाहणी करण्याची संधी मिळाली होती. ती एका रिपोर्टरसोबत असाइनमेंटवर तेथे पोहचली होती. तिचे खरे काम तेथील कैद्यांची एकट्याने फोटोज घेणे होते. मात्र, तिने तुरुंगात प्रवेश केल्यानंतर वेगळीच मोहिम सुरू केली.

 
तीन महीने दर आठवडा न चुकता तुरुंगात जाऊन तिने महिला कैद्यांसोहत वेळ घालवला. आणि त्या सगळ्यांचे फोटोज आपल्या कॅमेऱ्यात टिपले. तोमरने सांगितल्याप्रमाणे, तेथे कैद महिला वेग-वेगळ्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांश महिला कैदी ह्या अल्पसंख्याक आहेत. तुरुंगाचे वैशिष्ट्य म्हणजे, कैदेत असलेल्या महिला इस्रायली नाहीत. त्या प्रामुख्याने रशिया, इथियोपिया आणि दक्षिण अमेरिकेच्या आहेत. त्यातही अनेक महिला आपल्या गुन्ह्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा तुरुंगात आल्या आहेत. त्या सगळ्याच अतिशय छोट्या सेलमध्ये राहतात.


माजी कैद्याने सांगितली होती परिस्थिती
> 1979 मध्ये कैदेत राहिलेली पॅलेस्टिनी मुस्लिम महिला रसमियाह ओदेहने तुरुंगातील परिस्थिती यूएनसमोर मांडली होती. तिने तुरुंगात चालणारे प्रकार मानवाधिकार समितीकडे सांगितले होते. तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. त्यामध्ये महिलांसह त्यांच्या चिमुकल्यांना देखील कैद केले जाते. अतिशय छोट्या अशा सेलमध्ये 6 महिलांना अक्षरशः कोंबले जाते. संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळपर्यंत कुठल्याही महिलेला आपल्या सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाही. सगळेच गेट बंद ठेवले जातात. 
> फोटोग्राफरने सुद्धा ओदेहच्या आरोपांशी सहमती दर्शवली. हे तुरुंग कैद्यांना ठेवण्याच्या लायकीचे नाही. ओदेहने सांगितल्याप्रमाणे, ज्यू आणि मुस्लिम वादांमुळे तुरुंगात मुस्लिम महिलांना नमाज आणि दुआची सुद्धा परवानगी दिली जात नाही. शिक्षेच्या नावे येथे महिला कैद्यांना सुद्धा मारहाण केली जाते. त्यांच्यावर स्प्रे टाकून अत्याचार केला जातो.

 

बातम्या आणखी आहेत...