आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनपेक्षा जास्त वर्षांपासून बंद विमा पाॅलिसी पुन्हा सुरू करता येणार, एलआयसीची मंजुरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाने  दाेन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी लॅप्स झालेल्या जीवन विमा पाॅलिसीचे पुन्हा  नुतनीकरण  करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत दाेन वर्षांपेक्षा जास्त काळ लॅप्स झालेल्या पाॅलिसीचे नुतनीकरण करण्याची परवानगी नव्हती. परंतु आता अशा पाॅलिसीचे नुतनीकरण हाेऊ शकेल असे एलआयसीने साेमवारी स्पष्ट केले. यामुळे एलआयसीचा पर्सिस्टन्सी रेश्याे सुधारण्यास मदत हाेईल व प्रमियमच्या रुपाने मिळणाऱ्या त्यांच्या महसुलातही वाढ हाेईल. इर्डा प्राॅडक्ट रेग्युलेशन २०१३ एक जानेवारी २०१४ पासून अंमलात आले हाेते. त्यानुसार लॅप्स झालेल्या पाॅलिसीचे नुतनीकरण मर्यादा अगाेदरच्या अनपेड प्रिमियम तारखेच्या दाेन वर्षापर्यंत मर्यादीत हाेती. या काळात पाॅलिसीधारक प्रिमियमची भरपाई न झाल्याने खंडीत झालेल्या पाॅलिसीचे नुतनीकरण करू शकत हाेता. या निर्धारित कालावधीनंतर पाॅलिसीचे नुतनीकरण हाेऊ शकत नव्हते.  त्यासाठी एलआयसीने इर्डाकडे आपली बाजू मांडली.   नाॅन लिंक्ड पाॅलिसीसाठी अगाेदर अनपेडची तारीख पाच वर्षाच्या आत व युनिट िलंक्ड पाॅलिसी तीन वर्षाच्या आत नुतनीकरण करता येईल.

पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची चांगली संधी
एलआयसीचे एमडी विपीन आनंद म्हणाले, वेगवेगळ्या कारणामुळे पाॅलिसीधारक प्रिमियम भरू शकत नाहीत व त्यांची पाॅलिसी लॅप्स हाेते. अशा लाेकांसाठी आपली आयुर्विमा पाॅलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. जीवन विमा खरेदी हा माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा निर्णय असताे. आम्ही प्रत्येक पाॅलिसीधारकाचा सन्मान करताे व त्यांनी एलआयसीकडून विमा कवच कायम ठेवावे अशी मनीषा आहे. त्यासाठी नवीन पाॅलिसी खरेदी करण्याएेवजी जुनी पाॅलिसी पुन्हा चालू करणे याेग्य मार्ग आहे.

३० नाेव्हेंबरनंतर २४ पेक्षा जास्त याेजना बंद करू शकते एलआयसी
एलआयसी २४ पेक्षा जास्त व्यक्तीगत विमा उत्पादने, ८ समुह विमा याेजना व ७-८ रायडर्स ३० नाेव्हेंबरला बंद करत आहे. यामध्ये जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ सारख्या काही सर्वाेत्तम विक्री याेजनांचाही समावेश आहे. एका मिडिया रिपाेर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ३० नाेव्हेंबरनंतर उद्याेगातील ७५ ते ८० उत्पादने बंद हाेतील. या सर्व याेजना ८ जुलै २०१९ला जाहीर झालेल्या विमा उत्पादन नियमानुसार नाहीत. विमा कंपन्या या सर्व याेजना इरडाच्या सुधारीत ग्राहक केंद्रीत मार्गदर्शकतत्वानुसार पुढील काही महिन्यात सुधारित किंवा रिलांॅच करू शकते. इर्डाच्या एका अधिकाऱ्यांच्या मते सध्या नियमानुसार असलेली विमा उत्पादनांची संख्या जास्त असून एक डिसेंबरनंतरही त्याची विक्री हाेत राहिल. विमा कंपन्यांना आपल्या जाेखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही उत्पादने नव्या किंमतीसह पुन्हा बाजारात आणावी लागतील. काही प्रकरणांमध्ये प्रिमियमचा दरही कमी हाेऊ शकताे. परंतु सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही विमा उत्पादनांमध्ये कमी बाेनस दर आणि जास्त प्रिमियम दर देखील बघायला मिळू शकताे. एलआयसीचे विमा एजंट ३० नाेव्हेंबरच्या अगाेदर जास्तीत जास्त ग्राहकांना सध्याच्या याेजना खरेदी करण्यासाठी प्राेत्साहित करत आहेत. नवीन विमा उत्पादनांमध्ये कमी बाेनस दर व जास्त प्रिमियम दर बघायला मिळू शकताे असा त्यांच्या कयास आहे.

पर्सिस्टन्सी रेश्याे म्हणजे काय ?
या प्रमाणाच्या माध्यमातून विमा कंपन्या आपल्याकडे ग्राहक कायम राहण्याचे प्रमाण ताडून बघतात. पर्सिस्टन्सी रेश्याे हा किती टक्के विमाधारक पाॅलिसीच्या कालावधीनुसार एका वर्षाच्या आत  वा त्यापेक्षा जास्त वर्षात नूतनीकरण प्रिमियम देत आहेत हे सांगताे.

बातम्या आणखी आहेत...