आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे फेस्टिव्हलमध्ये शरद पवारांच्या हस्ते प्रेम चोप्रांना ‘जीवनगौरव’

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे यंदा ३१वे वर्ष साजरे होत आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. या वेळी जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा‍ऱ्या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ व ’पुणे फेस्टिव्हल अ‍वॉर्ड’ देऊन गौरवले जाते. यंदा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले गेले. तसेच ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सुबोध भावे, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी, महिला उद्योजक उषा काकडे व बॉडी बिल्डर संग्राम चौघुले यांना पुणे फेस्टिव्हल अ‍वॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस या वेळी देण्यात आले.

0