आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ग्रृहस्थ आपल्या मुलाच्या वाईट सवयींमुळे खुप टेंशनमध्ये होते, एकदा ते आपल्या मुलाला घेऊन महात्माजवळ गेले, महात्माने त्या मुलाला पहिले लहान रोपटे काढण्यास सांगितले, त्यानंतर मोठे झाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. एका गावात एक श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते आपल्या मुलाच्या वाईट सवयींमुळे खुप टेंशनमध्ये होते. ते त्यांच्या मुलाला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगत होते, पण मुलगा म्हणायचा की, अजून मी खुप लहान आहे, हळुहळू सोडून देईल. पण एक दिवस श्रीमंत व्यक्तीला कळाले की, त्याच्या गावात एक महात्मा आले आहेत. मग त्या व्यक्तीने महात्माजींना त्यांच्या मुलाच्या सवयीविषयी सांगितले. महात्माजी म्हणाले की - तुम्ही उद्या तुमच्या मुलाला माझ्या जवळ घेऊन या. मी तिथेच तुमची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. दूस-या दिवशी वडील मुलाला घेऊन महात्माजी जवळ गेले. महात्माजी तेव्हा बागेत आपल्या शिष्यांना प्रवचन देत होते. प्रवचन संपल्यानंतर ते या पिता-पुत्राला भेटले. महात्माजी त्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला म्हणाले की, चल आपण दोघं बागेत सफर करु. महात्मा आणि तो मुलगा बागेत फिरत होते. चालता चालता महात्माजी अचानक थांबले आणि त्या मुलाला म्हणाले की - तु हे झाड काढू शकतोस का? 


मुलगा म्हणाला - हो खुप सहज काढू शकतो. त्याने ते छोटेसे रोपटे काढले. थोडे पुढे केल्यानंतर त्यांना अजून थोडे मोठे झाड दिसले. यावेळी महात्माच्या म्हणण्यानुसार मुलाने ते रोपटे काढले. असे अजून एकदा झाले. त्या मुलाला झाडं काढायला खुप मजा येऊ लागली. थोडे पुढे गेल्यावर महात्माजींना एक जास्वंदाचे झाड दिसले. महात्माजीने त्या मुलाला ते झाड काढायला सांगितले. खुप प्रयत्न केल्यानंतरही ते झाडं मोडले नाही. मुलगा म्हणाला की - हे झाड खुप मजबूत आहे. हे काढणे अशक्य आहे. महात्माजी मुलाला म्हणाले की - आपल्या वाईट सवयींसोबतही असेच होते. जेव्हा या नवीन असतात तेव्हाच या सोडणे सोपे असते, पण या जुन्या झाल्यावर या सोडणे खुप कठीण असते. मुलाला महात्माजींची ही गोष्ट समजली. 

 

लाइफ मॅनेजमेंट 
वाईट सवयी सहज सोडता येत नाहीत. यासाठी दृढसंकल्प गरजेचा असतो. जर एखादा व्यक्ती सुरुवातीला या वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सोपे जाऊ शकते. पण जास्त काळ झाल्यानंतर या सवयींवर नियंत्रण मिळवणे अवघड होते. 

बातम्या आणखी आहेत...