आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा एक शेठजी संताला भेटले, विचारले समाधान कुठे मिळेल, संतांनी सांगितले जीवनाचे गुपित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एका  गावात एक विद्वान संत राहत होते. लोक त्यांच्याकडे आपल्या अडचणी घेऊन जायचे, त्यांना संताकडून समाधानकारक उत्तर मिळायचे. एके दिवस एक शेठजी त्या संताकडे आले आणि म्हणाले माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत कशाची काही कमी नाही, तरीदेखील माझे मन शांत नाही. मला समाधान मिळत नाही सांगा मी काय करू ..?
 

हे ऐकून संत जागेवरून उठले आणि आश्रमाकडे निघाले. शेठजी त्यांच्या मागे-मागे आले. आश्रमाच्या एका मोकळ्या कोपऱ्यात त्यांनी आग पेटवली आणि त्या आगीत ते हळू-हळू एकेक काडी टाकत होते. टाकलेल्या प्रत्येक काडीसोबत आग कमी जास्त होत होती. काही वेळाने संत परत आपल्या जागेवर येऊन बसले. खूप वेळ झाला तरी संत काहीच बोलले नाही म्हणून शेठजीने विचारले, गुरूजी मी आपल्या उत्तराची वाट पाहतोय. त्यावर संत हसुन म्हणाले एवढा वेळ मी तुझ्याच प्रश्नाचे उत्तर देत होतो, पण असे वाटे की तुला ते कळाले नाही, मी तुला समजावुन सांगतो.


संत म्हणाले प्रत्येक माणसात एक आग असते. जर तुम्ही त्यात काम, क्रोध, लोभ, मोह आणि मधाच्या काड्या टाकल्या तर जीवनात कधीच समाधान मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही या तत्वांना आगीत टाकायचे बंद करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. संताचे बोलने ऐकुन शेठजीला आपल्या समस्येचे समाधान मिळाले.


 
कथेची शिकवन 
प्रत्येक व्यक्तिला आपल्या आयुष्यात समाधान हवे आहे, पण त्यासाठी तो काहीच करत नाही. जीवनात शांतीसाठी मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. जर तुमच्या मनात काम, क्रोध, लोभ आणि मोह अशा भावना आहेत तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही. मन संतुष्ट झाल्यावरच समाधान शक्य आहे.