आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमध्ये भीक मागत होता भिकारी, एकेदिवशी शेठजीने त्याला विचारले - मी जर तुला पैसे दिले तर मोबदल्यात तू मला काय देणार?; शेठजीचे बोलणे ऐकून भिकारीने काय केले? जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क : एका शहरात एक भिकारी राहात होता. तो रेल्वेमध्ये लोकांकडे भीक मागून आपला जीवन जगत होता. एक दिवस भीक मागताना त्याला एक शेठजी दिसले. शेठजी जास्त पैसे देतील या आशेने तो त्यांच्याकडे गेला. शेठजीकडे भीक मागताच त्याची निराशा झाली. कारण शेठजीने त्याला विचारले की, 'मी तुला पैसे दिले तर त्या मोबदल्यात तू मला काय देशील?' त्यावर भिकारी म्हणाला, "मी तर एक भिकारी आहे. मी तुम्हाला काय देऊ शकतो?" तेव्हा शेठजी म्हणाले "तू जर मला काही देणार नसशील तर मग मी तुला का पैसे देऊ?" एवढे ऐकून भिकारी पुढच्या स्टेशनवर उतरला. पण शेठजींनी विचारलेला प्रश्न त्याच्या डोक्यातून जात नव्हता. अचानक रस्त्याच्या कडेला उमलणाऱ्या फुलांवर त्याची नजर पडली आणि त्याने ते फूल तोडून घेतले.

आता जो कोणी भिकारीला पैसे देत असे, त्या बदल्यात तो त्यांना फूल देत होता. काही दिवसांनंतर भिकारीला रेल्वेमध्ये शेठजी दिसले. भिकारीने त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, "तुम्ही जर मला पैसे दिले तर मोबदल्यात मी तुम्हाला काही देईल" शेठजीने जेव्हा पैसे दिले तेव्हा भिकारीने त्यांना फूल दिले. हे बघून शेठजींना आनंद झाला. शेठजी भिकारीला म्हणाले की, "आता तू भिकारी नाही तर एक व्यापारी झाला आहेस". शेठजींची ही गोष्ट भिकारीच्या लक्षात आली.

या घटनेला बराच कालावधी उलटून गेला. एक दिवस शेठजी रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांच्यासमोर एक व्यक्ती येऊन बसला आणि म्हणाला आज तुमची आणि माझी ही तिसरी भेट आहे. शेठजींना त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, "नाही. आपण आज प्रथमच भेटत आहोत". तेव्हा तो व्यक्ती म्हणाला. तुम्ही मला ओळखले नाही. मी तोच भिकारी आहे. जो पैशांच्या मोबदल्यात फूल देत होता. आपण तेव्हा म्हणालात की तू आता भिकारी नाही तर एक व्यापारी आहेस. तेव्हापासूनच मी भीक मागणे सोडले आणि फूलांचा व्यापार करण्यास सुरूवात केली.

आज माझा फूलांचा छान व्यापार आहे. तुमच्या एका विचाराने माझे आयुष्यच बदलले. अन्यथा मी आजही रेल्वेत भीक मागत फिरलो असतो. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यानंतर शेठजी म्हणाले की, तुझ्या यशाचे कारण मी नाही तर तू स्वतः आहेस. तू तूझ्या विचाराला मोठे केले आणि असंभव गोष्टीला संभव करून दाखवले.

लाइफ मॅनेजमेंट
जीवनात काहीच अशक्य नाही, आवश्यकता आहे तर फक्त आपल्या विचारसरणीची व्याप्ती वाढविण्याची. ज्या दिवशी आपण आपल्या विचारसरणीची व्याप्ती वाढवली, त्या दिवशी आपल्याला या जगात जे पाहिजे ते सर्वकाही प्राप्त होईल.

बातम्या आणखी आहेत...