Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | life management, motivational story yamdut and death

अहंकारामध्ये मुर्तीकाराने केली होती एक चूक, अशी चूक तुम्ही करू नका

रिलिजन डेस्क | Update - Dec 02, 2018, 12:01 AM IST

एक मूर्तीकार एकदम सजीव मूर्ती बनवत होता परंतु त्याला त्याच्या मृत्यूविषयी समजल्यानंतर त्याने यमदूतांना धोका देण्यासाठी स

 • life management, motivational story yamdut and death

  प्राचीन काळी एक मूर्तीकार अतिशय सुदंर आणि मनमोहक मूर्ती तयार करत होता. त्याने बनवलेल्या सर्व मूर्ती सजीव असल्यासारख्या दिसायच्या. त्या मूर्तिकाराला आपल्या कलेचा खूप अहंकार होता. दूर-दूरवरून लोक त्याच्याकडे मूर्ती बनवून घेण्यासाठी येत होते. एके दिवशी रात्री स्वप्नामध्ये त्याला आभास झाला की लवकरच आपला मृत्यू होणार आहे.


  > त्या स्वप्नांतर तो खूप दुःखी झाला. त्याने यमदूतांना भ्रमित करण्यासाठी एक उपाय शोधला.


  > मुर्तीकाराने स्वतःसारख्या दिसणाऱ्या 11 मूर्ती तयार केल्या. या सर्व मूर्ती हुबेहूब त्याच्याप्रमाणेच होत्या. कोणीही त्या मूर्ती खोट्या असतील असे सांगू शकत नव्हते. यमदूतांना भ्रमित करण्यासाठी तोही एका मूर्तीमध्ये जाऊन बसला.


  > यमदूत आल्यानंतर तेथील 11 मूर्ती पाहून ते आश्चर्यचकित झाले. यामधील खरा मनुष्य कोण आहे, हे त्यांना ओळखण्यास अवघड झाले. ते आता काय करावे याचा विचार करू लागले.


  > मुर्तीकाराचे प्राण हरण केले नाही तर सृष्टीचा नियम मोडणार आणि सत्य जाणून घेण्यासाठी मूर्ती तोडल्या तर कलेचा अपमान होणार.


  > तेवढ्यात यमदूताला मनुष्य स्वभावाची सर्वात वाईट अशी एक गोष्ट आठवली. ती म्हणजे अहंकार. यमदूताने एक चाल खेळली आणि म्हणाला 'या एवढ्या सुंदर मूर्ती बनवणारा भेटला असता तर त्याचे कौतुक केले असते आणि या मूर्तींमध्ये एक कमतरता राहिली आहे तेही सांगितले असते.'


  > हे ऐकून मूर्तीकाराचा अहंकार जागृत झाला आणि म्हणाला माझ्या कलेमध्ये काय कमतरता राहिली. या कामामध्येच मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.


  > मुर्तीकाराने लगेच विचारले - कोणती कमी?


  > यमदूताने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, फक्त हीच चूक केली तू तुझ्या अहंकारामध्ये.


  शिकवण
  अहंकारामध्ये व्यक्ती अनेकवेळा अशा चुका करतो, ज्यामुळे तो स्वतःच अडचणीत अडकतो. अशी चूक आपण कधीच करू नये.

Trending