Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Life management skills

ध्यान करताना गुरूंच्या मांडीवर बसायचे मांजरीचे पिल्लू, अचानक झाला साधुंचा मृत्यु , पुढे झाले असे...?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 08, 2019, 03:40 PM IST

मांजरीच्या पिल्ल्याला सोबत आश्रमत आणले

 • Life management skills

  एका गावात एक साधु राहत होते. एकदा ते आपल्या शिष्यांसोबत जंगलातून जात असताना तिथे त्यांना एक मांजरीचे पिल्लू दिसले, साधूंना वाटले हे पिल्लू जंगताल राहीले तर जंगली प्राणी त्याची शिकार करतील. त्यांनी त्या मांजरीच्या पिल्ल्याला सोबत आश्रमत आणले.

  मांजरीचे पिल्लू आश्रमात चांगले रमले आणि साधूसोबत राहु लागले. पण जेव्हा ते साधू ध्यानसाठी बसत तेव्हा ते मांजरीचे पिल्लू साधुच्या मांडिवर येऊन बसायचे, त्यामुळे त्यांची तपस्या भंग व्हायची. तेव्हा साधूने आपल्या शिष्यांना सांगितले की ध्यानासाठी जाईल तेव्हा या मांजरीच्या पिल्ल्याला एका झाडाला बांधून ठेवा, शिष्यांनी गुरूजींच्या आज्ञेचे पालन केले.


  आता हा रोजचा नियम ठरला, जेव्हा ते साधू ध्यानाला बसत तेव्हा पिल्लाला झाडाला बांधले जायचे. पण एक दिवस अचानक साधुंचा मृत्यू झाला. साधूंच्या मृत्यू नंतर एका योग्य शिष्याला आश्रमाचा प्रमुख करण्यात आले. यानंतर जेव्हा नवे गुरू ध्यानासाठी बसत तेव्हा मांजरीच्या पिल्लाला झाडाला बांधले जायचे कारण ते आपल्या गुरूंना याच पद्धतीने साधना करताना बघत आले होते. एक दिवस ते मांजरीचे पिल्लूही मेले. त्यावेळेस सर्व शिष्य एकत्र आले आणि चर्चा केली की, जोपर्यंत मांजरीच्या पिल्लाला झाडाला बांधणार नाही तोपर्यंत गुरूजी साधनेसाठी बसणार नाहीत. साधूंच्या साधनेसाठी त्यांनी शेजारच्या गावातून एक मांजरीचे पिल्लू आणले. त्याला झाडाला बांधल्यानंतरच गुरूजी ध्यान करण्यासाठी बसायचे.

  लाइफ मॅनेजमेंट

  आपल्या समाजात हजारो वर्षांपासून अनेक चालीरिती चालत आल्या आहेत. यामागे नेमके काय कारण आहे हे कोणालाच माहीत नाही. मागील काळात एखाद्या कारणामुळे या चालीरिती सुरू केल्या असतील पण आताच्या काळात याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण या परंपरा आणि चालीरितींचे मुल्यांकन केले पाहीजे.

Trending