आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावातील लोक बुध्दांना म्हणाले- त्या स्त्रीकडे जाऊ नका, नंतर बुध्दांच्या एका गोष्टीमुळे सर्व पुरुष झाले लाजिरवाणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क: बौध्द धर्माचे संस्थापक महात्मा बुध्दांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रचलित आहेत, यामध्ये जीवन जगण्याचे सूत्र लपले आहेत. या प्रसंगातून धडा घेतला तर आपले आयुष्य सुखी बनू शकते. आज जाणुन घेऊया बुध्दांसंबंधीत एक असा प्रसंग, ज्यामध्ये एका स्त्रीने त्यांना सन्यास घेण्याचे रहस्य विचारले. 


हा आहे प्रसंग...
- एकदा महात्मा बुध्द एका गावात गेले. तिथे एका स्त्रीने त्यांना विचारले की, तुम्ही एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसता. मग तुम्ही युवावस्थेत भगवे वस्त्र का परिधान केले?
- बुध्दांनी उत्तर दिले की, मी तीन प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी सन्यास घेतला आहे. बुध्दांनी सांगितले की, आपले शरीर युवा आणि आकर्षक आहे, परंतू हे वृध्द होईल, नंतर आजारी होईल, शेवटी मृत्यू येईल. मला वृध्दावस्था, आजार आणि मृत्यूच्या कारणाचे ज्ञान प्राप्त करायचे आहे. 
- बुध्दांचे बोलणे ऐकूण स्त्री खुप प्रभावित झाली आणि तिने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले. 
- ही गोष्ट गावातील लोकांना माहिती होताच सर्व बुध्दांना म्हणाले की, त्या स्त्रीकडे जाऊ नका, कारण ती स्त्री चरित्रहीन आहे. बुध्दांनी गावातील सरपंचांना विचारले की, हे खरे आहे का?
- सरपंचांनीही गावातील लोकांसोबत सहमती दर्शवली. बुध्द सरपंचांचा एक हात पकडून म्हणाले की, आता टाळी वाजवून दाखवा. यावर सरपंच म्हणाले की, हे असंभव आहे, एका हाताने टाळी वाजू शकत नाही. 
- बुध्द म्हणाले की, अशा प्रकारे कोणतीही स्त्री एकटीच चरित्रहीन असू शकत नाही. जर गावातील पुरुष चरित्रहीन नसते, तर ती स्त्रीही चरित्रहीन नसती. 
- बुध्दांचे हे बोलणे ऐकूण गावातील सर्व लोकांनी शरमेने माना खाली घातल्या.
10 mins

बातम्या आणखी आहेत...