आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडून झालेल्या चुकांना तुम्हीच जबाबदार आहात, त्यासाठी इतरांना दोष देऊ नये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - कधी-कधी नकळतपणे आपल्या बोलण्याने इतरांचे मन दुखावले जाते. यामुळे आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागतो. अखिल भारतीय गायत्री परिवाराचे संस्थापक पं.श्रीराम शर्मा आचार्यनुसार जाणून घ्या अशा परिस्थितीत आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. 

 

आपल्या चुकांबाबत दुसऱ्यांना दोषी ठरवू नका
स्वतःला माफ करण्यापूर्वी तुम्ही काय केले होते हे जाणून घ्या. आपल्या चुकांबद्दल दुसऱ्यांना दोष देऊ नका. आपल्याला फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायला हवे आणि आपली चुक सुधारण्याकडे लक्ष द्यावे. 

 


क्षमा मागताना कधीच लाजू नका

क्षमा मागणे सोपे नसते. पण तुम्ही जर कोणाची क्षमा मागण्यासाठी पुढाकार घेत असाल तर यातून तुमची चूक झालीये हे सिद्ध होते आणि तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत आहे. अशाप्रकारे तुम्ही त्या चुका करण्यापासून वाचता. क्षमा मागताना कधीच लाज वाटू देऊ नका. क्षमा मागण्यामुळे आपला अहंकार संपतो. 

 


नकारात्मक विचारांपासून दूर रहा
कधी-कधी आपण स्वतःच आपल्या चुकांबद्दल माफ करू शकत नाही. स्वतःला क्षमा करणे हे एकदा शक्य नाही. पण हळू-हळू वेळेनुसार होते. यासाठी तुमच्या मनात नकारात्मक विचार आले तर एक खोलवल श्वास घेऊन त्याचवेळी ते विचार दूर करा आणि दुसऱ्या कामात लक्ष द्या. 

 

आपल्या चुकांसाठी आभार माना
आपल्या चुकांप्रती आभारी होने तुम्हाला विचित्र वाटेल. विशेषतः अशा चुका ज्यांमुळे तुम्हाल लाज वाटत असेल किंवा दुःख झाले असेल. पण तुम्ही जर या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्हाला जाणवेल की, अशा चुकांनी तु्म्हाला किती मजबूत केले आहे. तुम्ही या चुकांमुळेच अधिक बुद्धिमान, मजबूत आणि विचारशील झाले आहात. 

बातम्या आणखी आहेत...